सावडी येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून कोविड सेंटरचे उद्घाटन
करमाळा समाचार – संजय साखरे
सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्हा परिषदेने पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात शासकीय कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शंभर गावात उपक्रम राबविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. परंतु सावडी गावची लोकसंख्या ही पाच हजारांपेक्षा कमी आहे व तालुक्यापासून दूर असल्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे हे पाहून सावडी गावचे सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत व लोकसहभागातून श्री हिराभारती महाराज कोवीड सेंटर सुरू करण्याचे नियोजन केले व गावातील ग्रामस्थांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि पन्नास बेडचे कोवीड सेंटर चे उद्घाटन जिल्ह्याचे नेते, करमाळा -माढा तालुक्याचे आमदार श्री.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

मामांनी ग्रामपंचायत व लोकसहभागातून निर्माण केलेल्या कोवीड सेंटरचे व रूग्ण सेवक व ग्रामस्थांचे कौतुक करून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या कोविड सेन्टर साठी मोठया प्रमाणात मदतीचा ओघ सुरू असून सावडी गावातील नोकरी व व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असलेल्या लोकांनी मोठा मदत निधी जमा करून आपत्ती व्यवस्थापन समिती कडे दिला आहे. यावेळी शिंदे गटाचे नेते श्री तानाजी बापू झोळ,सावडी विविध का.सो.चे चेअर मन श्री सतीश शेळके, डॉ.अमोल दुरंदे, डॉ.वैष्णवी अभिमन्यू देशमुख, डॉ. प्रतिक्षा भरत अनारसे, आरोग्य सेविका काळे, आरोग्य सेवक बंडगर सर, आशा वर्कर उपस्थित होत्या.
तसेच सरपंच भाऊसाहेब शेळके, उपसरपंच महेंद्र एकाड ग्रामसेवक नलवडे, भाऊसाहेब, तलाठी लोमटे भाऊसाहेब, जि.प.प्रा शाळेचे मुख्याध्यापक मोहीते सर, मार्केट कमिटी उपसभापती जालिंदर बापू पानसरे, कुंभारगावचे उपसरपंच दशरथ पानसरे,बाबू खुळे, ग्रा. पं सदस्य सुदाम तळेकर ज्येष्ठ सहकारी मित्र आदमभाई शेख,शकिलभाई शेख,राम मचाले, कालिदास तळेकर, राजेंद्र देशमुख, अभिमान एकाड, श्रीराम एकाड,दादा जाधव, गजानन जाधव,केशव तळेकर, हनुमंत एकाड, बापू जाधव,दादा गुरव रवी तळेकर ग्रा. पं कर्मचारी व ग्रा. पं सदस्य उपस्थित होते.

सावडी गावची लोकसंख्या 5 हजार पेक्षा कमी असल्याने शासकीय कोविड सेन्टर ला परवानगी मिळणे शक्य नव्हते.म्हणून आम्ही लोकसहभागातून कोविड सेन्टर ची उभारणी केली आहे. याला गावातील लोक मोठया प्रमाणावर मदत करत आहेत. श्री भाऊसाहेब शेळके, सरपंच, ग्रामपंचायत सावडी,ता करमाळा.