राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने मध्ये नावे समाविष्ट करा – करमाळयात बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने
प्रतिनिधी | करमाळा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये नावे समाविष्ट करुन धान्य द्यावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम(rajabhau kadam) यांच्या नेतृत्वाखाली बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कचेरी समोर जोरदार घोषणा देत निदर्शने केले. यावेळी निवेदन नायब तहसिलदार विजयकुमार जाधव यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी राजाभाऊ कदम म्हणाले, विभक्त रेशनकार्ड व नवे रेशनकार्ड धारकांना धान्य मिळावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत रेशन कार्ड धारकांची नावे समाविष्ट करावेत, ज्यावेळेस नागरिक नवीन रेशन कार्ड काढतात तेंव्हा त्यांना धान्य मिळत नाही म्हणून तहसीलदार यांनी विषेश मोहीम राबऊन करमाळा तालुक्यातील सर्व गरजू व पात्र लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करावे तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लोकांना वेळेत पेंशन मिळाली पाहिजे व तलाठी, मंडलाधिकारी यांनी निराधार, वयोवृद्ध, अपंग, विधवा यांचा शोध घेऊन संजय गांधी निराधार योजनेचे फार्म भरून घ्यावेत तशा सुचना तहसीलदार यांनी कराव्यात.
तालुक्याचे आमदार संजय शिंदे यासर्व प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने सर्व सामान्य जनता नाराज आहे. नागरिकांनी आमच्याकडे हे सर्व प्रश्न सोडवण्याची मागणी केल्याने बहुजन संघर्ष सेनेने शासनाला जागे करण्यासाठी निदर्शने केली आहेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा काढू असा ईशारा राजाभाऊ कदम यांनी दिला .

यावेळी तालुका अध्यक्ष अंगद लांडगे, शहर अध्यक्ष आजिनाथ कांबळे, शेतकरी संघटनेचे आण्णा सुपनर, पांडेचे सरपंच अनारसे, आप्पा भोसले, मारुती भोसले, मच्छिंद गायकवाड, विष्णू रंदवे, महादेव भोसले, रामा पांडव, दादा चव्हाण, प्रेमकुमार सरतापे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.