कोरोनामुळे आर्थिक गणीत बिघडलेले असताना बागल यांच्याकडुन युवकांसाठी पुढाकार
करमाळा समाचार
करमाळा नोकरी मार्गदर्शन आणि पोलीस भरतीपूर्व तयारी साठी ऑनलाईन सराव परीक्षा व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

आपल्या तालुक्यातील सुशिक्षित युवांना नोकरी मिळून त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व युवांसाठी करमाळा नोकरी मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस भरती पूर्व तयारी करीता ऑनलाइन सराव परीक्षा व मार्गदर्शन केंद्र चे उद्घाटन मकाई चे चेअरमन श्री. दिग्विजय बागल यांनी केले.
विविध कंपन्यांमध्ये अनेक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध असतात परंतु त्या आपल्या तालुक्यातील तरुणांपर्यंत योग्य वेळेत पोहोचत नाहीत किंवा त्याविषयीचे योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडे नसते. ह्या सर्व परिस्थिती मुळे आजच्या युवकांचे मनोधैर्य खचत चालले आहे. तसेच अनेकदा नोकरीसाठी लागणाऱ्या संभाषण कौशल्याचा अभावही युवकांमध्ये दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

या विषयी पुढे बोलताना श्री बागल म्हणाले नोकरी मार्गदर्शन केंद्रामार्फत 5 वी पासून ते पदवी (कोणत्याही शाखेतील), पदव्युत्तर(कोणत्याही शाखेतील), I.T.I., डिप्लोमा(कोणत्याही शाखेतील) पर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुण-तरुणींना ,
नोकऱ्यांची संधी उपलब्ध असणाऱ्या औरंगाबाद, पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील मन्युफॅक्चरिंग, रिटेल ,फार्मसी, फायनान्स , हॉस्पिटीलिटी , बँकिंग , टेलिकॉम , आय.टी. , बी.पी.ओ. , के.पी.ओ. अश्या अनेक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचा मानस आहे.
तरुण तरुणींची निवड थेट मुलाखतीतून करण्यात येईल. ज्या उमेदवारांची मुलाखती मध्ये निवड होणार नाही अश्या उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यासोबतच या वर्षा अखेर पर्यंत राज्यात पोलीस भारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या तालुक्यातील युवकांना शारीरिक – मैदानावरील परीक्षा मध्ये जास्त अडचणी येत नाही, अडचण येते ती लेखी परीक्षा मध्ये. म्हणून त्यात सुद्धा करमाळा तालुक्यातील युवकांनी कुठेही मागे राहू नये म्हणून पोलीस भरती पूर्व तयारी ऑनलाइन सराव परीक्षा व मार्गदर्शन केंद्रची सुरुवात करत आहोत. यामध्ये पोलीस भरतीसाठी इच्छूक असणाऱ्या सर्वाना त्याच्या व्हाट्सएप नंबर वरती एक लिंक पाठवण्यात येईल त्या लिंक च्या माध्यमातून त्यांच्याकडून दररोज ऑनलाइन पद्धतीने प्रश्न सोडवून घेण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर सराव होईल व भरती परीक्षेत वेळेचे नियोजन करता येईल. याचा फायदा प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस त्यांना होईल असे मत श्री. दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले आहे.
या नोकरी मार्गदर्शन केंद्रामार्फत जास्तीत जास्त गरजू तरुण तरुणींना नोकरीचा लाभ आणि पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रामधून पोलीस भरतीची परीक्षा सुलभ करण्याचा आमचा मानस आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी बागल संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपले नाव नोंदणी करावी असे आव्हान या वेळी श्री. दिग्विजय बागल यांनी युवांना केले आहे.