पुणे विभागात लसीकरणात सोलापुरावर होतोय अन्याय ; पुणे जिल्हा आहे पहिल्यास्थानी
करमाळा समाचार
पुणे विभागातील जिल्ह्यामध्ये पुणे वगळता इतर जिल्ह्याच्या लसीकरणाची आकडेवारी चिंताजनक आहे. तर सोलापूर जिल्हा अधिक मृत्यू होण्यात दुसऱ्या स्थानी असतानाही लसीकरणात मात्र आठव्या स्थानी आहे.


पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय केविलवाणी प्रकारचे आहे. पुणे जिल्ह्यात आज पर्यंत 11068 मृत्यू झालेले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात 3720 मृत्यू झालेले आहेत. तरी पुण्यात लसीकरणाची टक्केवारी पाहता सोलापूर जिल्ह्याच्या दुपटीपेक्षा ही जास्त लसीकरण पुणे जिल्ह्यात झालेले दिसून येत आहे.
तर पुणे विभागाच्या तुलनेत पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांना अधिक प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. त्या मानाने इतर जिल्ह्यांचे लसीकरण कमी झाले आहे. त्यामुळे लसीकना वरून पुन्हा एकदा पालकमंत्री दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधक बोट दाखवू लागले आहेत.
