शालेय सांस्कृतिक कार्यक्रमातूनच उद्याचा उकृष्ट कलाकार घडत असतो – मंजुळे
प्रतिनिधी –
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आज कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर -१ नगर परिषद करमाळा या शाळेत मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सैराट, झुंड चित्रपटाचे प्रतिभावंत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे बंधू भारत मंजुळे उपस्थित होते. आपल्या शुभेच्छापर भाषणात मंजुळे म्हणाले की भावी उत्कृष्ट कलाकाराची जडण-घडण ही लहान विद्यार्थी दशेपासून घडत असते फक्त त्याला संधी मिळणे व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते,आणि सा. ना. जगताप प्राथ. मुलींची शाळा नं,१ ही शाळा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना संधी, प्रोत्साहन देणारी शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने असणारी धडपड कौतुकास्पद आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य आहे.

पहिली ते चौथीतील मुलींनी देशभक्ती पर आधारित गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर केले, व काही मुलींनी देशभक्तीपर गीत मधुर आवाजात गायीले.
कार्यक्रामाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.दयानंद चौधरी सर यांनी केले. इयत्ता तिसरी मधील समीक्षा थोरे हीचा अबॅकस ऑनलाईन इंटरनॅशनल लेवेल ला प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत मुथा अबॅकस क्लासच्या संचालिका सौ.ज्योती मुथा मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ सदस्य सौ.मोहिनी वीर, डॉ.सुवर्णा अभंग,सौ.मंजुळे,श्री.परदेशी,श्री.मोरे तसेच पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.भाग्यश्री पिसे मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.भालचंद्र निमगिरे सर मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ.चंद्रकला टांगडे,सुनिता क्षीरसागर,सुवर्णा वेळापुरे,रमेश नामदे,मोनिका चौधरी,तृप्ती बेडकुते,निलेश धर्माधिकारी,संध्या शिंदे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.