जैन साधु हत्ये प्रकरणातील आरोपींना कडक शासन करावे – जैन समाज
प्रतिनिधी | करमाळा
कर्नाटक येथे जैन साधू आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी यांच अपहरण करून हत्या केलेल्या आरोपींना कडक शिक्षा द्यावी. यासाठी आज करमाळासकल जैन समाजाच्या वतीने करमाळा पोलीस ठाणे येथे निषेध करीत निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व जैन समाज उपस्थित होता.

बेळगाव येथील चिकोडी जवळ हिरेकोडी मध्ये जैन साधू आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी यांचा दि ५ रोजी अपहरण करून आज्ञातस्थळी नेऊन दिनांक ७ जुलै रोजी सकाळी पूर्वी त्यांची हत्या करण्यात आली. सदर घटनेने संपूर्ण जैन समाजावर मोठा धक्का पोहोचला आहे. संपूर्ण समाजाने आक्रोश व्यक्त केला आहे. या हत्ये मागे असलेल्या दोन गुन्हेगारांना कर्नाटक पोलिसांनी पकडले आहे. जैन सकल समाज भारत आणि सकल जैन समाज करमाळा यांच्या वतीने सदरचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात संबंधित आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जैन साधू संत यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार होणाऱ्या घटना जैन साधू साध्वी सुरक्षित राहिले नाहीत . वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या साधू यांच्या सुरक्षेच्या बाबतीत ठोस पावले उचलावीत. याबाबत आणि सकल जैन समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहेत. सत्य परिस्थिती आणि माहिती योग्य पद्धतीने समाजापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे देशात अहिंसक आंदोलन सुरू होतील याबाबत इशाराही देण्यात आला आहे.
