जरांगेचा सरकारला अल्टिमेटम ! ; अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जा
करमाळा – विशाल घोलप
सरकारला आचारसंहिता लागण्याआगोदर सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यांनी अधिसुचना काढली आहे. २०१२ च्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर आचारसंहितेच्या अगोदर त्यांना करावे लागणार आहे आणि ते करतील. कारण मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे प्रश्न सोडवल्याशिवाय सरकार निवडणुका घेणार नाही. आम्ही नऊ तारखे पर्यत वाट बघु तिथुन पुढची भुमीका जाहीर करु शिवाय देवेंद्र फडणवीस समाजाचा आडवे चालण्याची भुमीका घेऊ शकत नाहीत. ते नक्कीच आता सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करतील अन्यथा सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे.

ते रविवारी वांगी क्रमांक एक येथे देशमुख यांच्या लग्नाच्या निमित्ताने वांगी येथे आले होते. यावेळी नवदांपत्याला आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आशीर्वाद देतानाही मला केवळ मराठा आरक्षणावरच बोलता येतं असे म्हणत नऊ दांपत्याला शुभेच्छा दिल्या.

जाणून बुजून एखाद्या समाजाबरोबर जर द्वेशाने वागायचे असेल त्याला विनंती करून किंवा सांगून काय उपयोग होणार नाही. यासाठी आपणाला त्याच्यावर उपचारात्मक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यासाठी समाजाला आता ठरवावे लागेल जर आपल्याच नरडीवर सुरी ठेवण्याचा काम फडणवीस त्यांच्याकडून होत असेल तर आता समाजाने कुठेतरी विचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सग्यासोयऱ्यांची अधिसूचना काढली व त्याची जबाबदारी आता त्यांची आहे. सहा महिने समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. एकदा ते जर समाजाच्या मनातून उतरले तर पुन्हा पुढच्या पायऱ्या चढणे अवघड होईल. त्याशिवाय फडवणीस यांनीही यात लक्ष घालणे गरजेचे आहे. केवळ त्यांनी केसेस करून समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवून थांबू शकत असतील तर गैरसमज झाला असेल तर चुकीचा समज आहेत. निष्पाप लोकांना गुतवलेले लोक पुन्हा माझ्यासोबत जुडु लागले आहेत.
एखादी जात जर मागास सिद्ध झाली तर त्यांना ओबीसीत घ्यायला हवी त्यानी वेगळा पर्याय उपलब्ध करण्याची गरज काय आहे. आपला राजकीय मार्ग नसुन लोकसभेला कोणाच्या मागे जावे असे सांगणे टाळले. आज तुम्हाला आमच्यात राजकारण दिसत आहे. पण त्यांनी स्वतःची भाषा बदलु नये समाजाचा तुमच्यावर विश्वास आहे असेही जरांगेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडुन अपेक्षा केली. नवलेबाबत सरकारने येवढ्या सुड भावनेने वागण्याची गरज नाही. हैदराबाद गॅजेटचे काय झाले ? मला राजकारण करायचे नाही आधी एक चुक झाली आहे आता त्यांनी माझ्या नादी लागु नये. सामान्य मराठा मुलासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलावर एस आय टी नेमली ज्यांनी हजारो करोडो लुटलेत ते आज ते सुंगधी अगरबत्तीसारखे तुमच्या सोबत फिरत आहेत त्यांच्यावर एस आय टी नेमायला हवी तर आम्ही प्रामाणीक काम करुन आमची चौकशी सरकारने सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी करावी हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल असा शब्दही जरांगे यांनी दिला.