करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मुख्याध्यापकास जामीन

करमाळा – नाना घोलप

दि ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास मौजे खांबेवाडी तालुका करमाळा येथील सोमनाथ मारुती नरोटे व नीता सोमनाथ नरोटे यांचेवर सुभाष पांडुरंग शिंदे, रवींद्र सुभाष शिंदे शांतीलाल पांडुरंग शिंदे, सुनील पांडुरंग शिंदे, आशाबाई सुभाष शिंदे रा. खांबेवाडी यांनी जीवघेणा हल्ला केल्या बाबतची फिर्याद करमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.

यावेळी भादवी कलम 307 326 324 323 506 143 144 147 148 149 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली होती. यातील आरोपी सुनील पांडुरंग शिंदे यांनी एडवोकेट निखिल पाटील व ॲडव्होकेट सुहास मोरे यांचे मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मिळणे कामी धाव घेतली होती. सदर जामीन अर्जाचे सुनावणी वेळी आरोपी सुनील शिंदे यांच्यातर्फे एडवोकेट निखिल पाटील व अडवोकेट सुहास मोरे यांनी सदर केस मध्ये भा.द.वि.कलम 307 किंवा 326 लागू होत नसून यातील जखमी यांना तशा प्रकारच्या कोणत्याही जखमा नाहीत, तसेच सदर आरोपी हा केवळ मध्यस्थी होता व त्याचा उद्देश दोन्ही बाजू मधील वाद मिटवणे हाच होता. त्याचा फिर्यादी व जखमींना जीवे मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता सर्व हत्यारे जप्त झालेली असून प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे. सदरचा आरोपी हा मुख्याध्यापक असून सदर गुन्ह्यामध्ये त्याचा कोणताही सहभाग नाही असा युक्तिवाद केला.

सदर युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनील पांडुरंग शिंदे याची 25 हजार रुपयांच्या जातमचलक्यावर व अटी व शर्तीवर जामिनावर मुक्तता करण्यात आली. सदर अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री एल एस चव्हाण यांच्यासमोर झाली. यात संशयीत आरोपी तर्फे ऍडव्होकेट निखिल पाटील, एडवोकेट सुहास मोरे करमाळा, एडवोकेट दत्तप्रसाद मंजरतकर, एडवोकेट सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE