जिंती गावचा आठवडे बाजार उद्यापासून सुरू ; सरपंच संग्रामराजे भोसलेंची माहीती
जिंती – दिलीप दंगाणे
कोरोणामुळे बंद असलेला जिंती गावचा आठवडे बाजार उद्या दिनांक २०/१०/२०२१ पासून नियमित चालू होणार आहे अशी माहिती जिंती गावचे सरपंच संग्राम राजेभोसले यांनी दिली आहे. सदरील निर्णय हा ग्रामपंचायत स्थळावर ती घेतला असून या निर्णयाचे जिंती आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वागत केले आहे.


जिंतीगावचा आठवडे बाजार साठी व्यापारी म्हणून भिगवन राशिन ते सावडी कोर्टी कुंभारगाव पारेवाडी देलवडी खानोटा येथील व्यापारी वर्ग जास्त प्रमाणात असतो तसेच बाजार साठी ग्राहक म्हणून जिंती, रामवाडी, नेमतवाडी, भिलारवाडी, देलवडी, टाकळी, खातगाव, कात्रज, कोंढार, चिंचोली, भगतवाडी, गुलमरवाडी इतर लोकांचे नागरिक बाजारासाठी असतात तसेच ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पट्टा असल्यामुळे ऊसतोड कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारासाठी येत असतो त्यामुळे ग्राहकांनी व व्यापारी वर्गणी सामाजिक अंतर ठेवून व तोंडाला मास्क लावून बाजारासाठी यावे असे आव्हान जि प सदस्य सौ सविता देवी राजे भोसले यांनी केले आहे.
लहान मुलांनी बाजारात फिरू नये तसेच ज्या ग्राहकांचा बाजार झाला आहे अशा ग्राहकांनी बाजारात गर्दी करू नये. – संजय भोसले उपसरपंच जिंती.
आठवडी बाजार मुळे बाहेरगावचे गिराईक चांगल्या प्रमाणात होते. तसेच बाजारातील छोटे किराणा दुकानदार देखील किराणा माल खरेदी साठी आमच्याकडे येतात.
-विपुलशेठ दोभाडा, होलसेल किराणा व्यापारी जिंती.