शिवसेना उपप्रमुखाचा राजीनामा ; गटातटानंतर आता शिवसेनेतुनही पदाधिकारी धरु लागले वेगळी वाट
करमाळा समाचार
सोलापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख भारत अवताडे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली आहे. बंडखोरांना शिवसेनेत संधी मिळते परंतु कामगारांना किंमत मिळत नाही अशी तक्रार अवताडे यांनी करत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्याचा सांगितला आहे.

यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत भारत आवताडे यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी सांगतानाही मागील विधानसभेला बंडखोरी केलेले मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी हे विरोधी गटाचे काम करून सुद्धा आज शिवसेनेत मान उंच करून नेत्यांच्या गाठीभेटी घेत असतात. परंतु जे विद्यमान पदाधिकारी आहेत एकनिष्ठ आहेत त्यांनी पक्षासाठी काम केले आहे. त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही. शिवसेना मोठी करण्यात वाढवण्यात त्यांचा कसलाही हात नसताना त्याना विचारात घेतात. पण जे काम करतात किंवा शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यांना किंमत दिली जात नाही अशा तक्रारी करत आवताडे यांनी आपला राजीनामा थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पाठवला आहे.

भारत अवताडे हे आमदार तानाजी सावंत यांचे समर्थक म्हणून शिवसेनेत होते. मागील विधानसभा निवडणुकीनंतर सावंत यांच्याकडेही तितके लक्ष दिले नाही. तर शिवसैनिक म्हणून आपल्याकडे ही त्या प्रमाणात लक्ष दिले जात नसून पक्षवाढीसाठी कामे घेऊन गेले तर ते कामे होत नाहीत असे दिसत असल्यानेच आपण पक्ष सोडत असल्याचे अवताडे यांनी सांगितले. तरी इथून पुढे कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार पुढील पक्ष ठरवून त्या ठिकाणी प्रवेश केला जाईल असेही अवताडे यांनी जाहीर केले.