करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

करमाळा पोलिसांचे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर मोठी कारवाई

करमाळा – समाचार 


दिनांक 12/06/2021 रोजी ढोकरी गावाच्या कडेला भीमा नदीच्या पात्रातून यांत्रिक बोटी च्या साह्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला मिळाली. लगेच करमाळा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस नाईक गणेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे यांचे टिमणे कारवाई केली यावेळी

बोट मालक १)विकास देवकर राहणार शहा तालुका इंदापूर बोटीवरील कामगार २) सलीम रहमान शेख वय ३० राहणार झारखंड ३) नुरुल खाइज शेख वय तीस वर्ष पश्चिम बंगाल ४) इकरामुल बिसल शेख वय 35 झारखंड या संशयीता विरोधात करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

सदरची फिर्याद पोलीस नाईक कांबळे साहेब यांनी दिली आहे. वरील आरोपी कडून एक वाळू वाहतुकीची बोट किंमत 6,40,000/ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून वाळूची बोट वाहून नेण्यास अवजड असल्याने व वाळू पर्यावरणाच्या दृष्टीने नदीत असणे आवश्यक असल्याने सदरची बोट होडी च्या मदतीने पाण्याच्या मध्यभागी नेऊन तिला छिद्र पाडून खोल पाण्यात बडवून देण्यात आली. सदर गुन्ह्यातील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तळपे करत आहेत.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE