महसूल दिनाचे औचित्य साधून करमाळा तालुका तलाठी संघातर्फे मान्यवरांचा सत्कार
करमाळा समाचार
करमाळा तालुका तलाठी संघाच्या वतीने आज माढा विभागातील उत्कृष्ट नायब तहसीलदार मा. विजयकुमार जाधव रावसाहेब, उत्कृष्ट मंडळ अधिकारी मा सादिक काझी भाऊसाहेब, उत्कृष्ट अव्वल कारकून मा. हणमंत जाधव भाऊसाहेब, उत्कृष्ट महसूल सहाय्यक मा मोटे भाऊसाहेब, उत्कृष्ट शिपाई जाधव काका, उत्कृष्ट कोतवाल श्री रवी जाधव तसेच वांगीचे उत्कृष्ट पोलीस पाटील गहिनीनाथ क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच करमाळा येथे नव्याने रुजू झालेले महसूल नायब तहसीलदार मा शैलेश निकम रावसाहेब यांचाही सत्कार करण्यात आला….करमाळा तालुका तलाठी संघाचे नवनियुक्त अध्यक्ष मा संजय शेटे भाऊसाहेब यांचा सत्कार मा प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव रावसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
