करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची दमदार कामगिरी ; दोन दिवसात मंजुर केला एक कोटी निधी

करमाळा समाचार


तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा शासकीय आदेश निघाला आहे. यामधून बारा रस्त्यांची कामे सुचवण्यात आली होती. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत मार्गदर्शनाखाली निधी मिळवला आहे.

जातेगाव येथील अनेक प्रलंबित प्रश्नासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे व सरपंच छगन ससाने जातेगावच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे केली होती. याचा पाठपुरावा करून मंत्रालयातून यांनी मंजुरी मिळाली आहे.

यामध्ये पोपट पोळ घर ते सुनील शिंदे घर, रमेश शिंदे ते राहुल शिंदे यांचे घर, सुनील शिंदे ते काशिनाथ कामटे, यशवंत शिंदे ते दत्तात्रय माने यांचे घर, दत्तात्रय माने ते बलभीम काकडे यांचे घर, हरी शिंदे यांचे घर ते भैरवनाथ मंदिर, गोरख गोरख धुमाळ ते सुनील कामठे यांचे घर या सात रस्त्यासाठी सिमेंट रस्ता करण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.

जातेगाव ते वडगाव रस्ता खडीकरण करणे दहा लाख रुपये, अण्णाभाऊ साठे सभागृह बांधणे दहा लाख रुपये, जुना करमाळा रस्ता दुरुस्त करणे दहा लाख रुपये, सार्वजनिक सभागृह बांधणे दहा लाख रुपये, जातेगाव ते दिघी रस्ता दुरुस्त करणे दहा लाख रुपये, या पद्धतीने बारा कामांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे १कोटी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE