करमाळ्यात क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
करमाळा समाचार
क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांची १९०वी जयंती करमाळा शहरात महात्मा फुले समता परिषद ,संत सावता माळी युवक तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीमाईंच्या प्रतिमेला युवा नेते शंभुराजे जगताप, यशकल्याणी संस्थेचे गणेशभाऊ करे पाटील , तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी पुष्पहार अर्पन केला.

क्रांतीजोती सावित्रीमाईंचे विचार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे.सर्व सामान्य महिला ही आणखीण चाचपडतच आहे तिला खरा प्रकाश माईंचे विचारच दाखवतील आणि स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख उंचावतील.असे मत युवा नेते शंभुराजे जगताप यांनी व्यक्त केले. या प्रसंगी यशकल्याणी संस्थेचे गणेश भाऊ करे पाटील माईंना अभिवादन करताना म्हणाले की, सावित्रीमाई या देशातील पहिल्या शिक्षिका होत .त्यांनी दगडधोंडे ,शेण अंगावरून छेलले पण शिक्षणाचा हाती घेतलेला वसा टाकला नाही म्हणुनच आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे.

या प्रसंगी अ.भा.महात्मा समता परिषद आणि संत सावता माळी युवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे जाहीर आभार मानले तसेच सावित्रीमाईंच्या नावे महिला उद्योजक,महिला नवउद्योजक यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून एखादा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करून महिला उद्योजक घडवण्याचा महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावा अशी आशा पण त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सरपंच हनुमंत नाळे, सरपंच दादासाहेब जाधव ,मार्गदर्शक अभंग सर,मा.नगरसेवक जयकुमार कांबळे ,शहराध्यक्ष अमोल नाळे ,शिवसेना उपाध्यक्ष मयुर यादव,सचिन जाधव,लालासाहेब जाधव,राऊत गुरूजी, नामदे गुरूजी ,दुधे गुरूजी, मोहोळकर सर, जाधव गुरुजी, विवेक अवसरे,प्रशांत घनवट, गणेश माळी, विजय वाघमारे, आदी फुलेप्रेमी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.