करमाळासोलापूर जिल्हा

निसर्गप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने वृक्ष संगोपन कार्यक्रम संपन्न

करमाळा समाचार 

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे मात्र लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करून त्यांची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे हेच काम निसर्गप्रेमी प्रतिष्ठान सध्याच्या काळात चांगल्या पद्धतीने करत असल्याचे मत करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन व नगरसेवक कन्हैयालाल देवी यांनी व्यक्त केले.

निसर्गप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने जुलै महिन्यात गुळसडी रोड वरील माळरानावर लावण्यात आलेल्या वृक्षांचा संगोपन करण्यात आले.यावेळी झाडांना आळे करणे,साफ सफाई करून झाडांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड लावण्यात आले. त्या ठिकाणी *आपलं शांतीबन* या नाम फलकाचे अनावरण नगरसेवक कन्हैयालाल देवी,नगरसेवक अतुल फंड,नगरसेवक सचिन घोलप,नगरसेवक महादेव फंड, भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव दिपक चव्हाण,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके,शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,प्रतिष्ठान चे सचिव नरेंद्र ठाकूर,उपाध्यक्ष प्रकाश क्षिरसागर,निलेश माने, मा.नगराध्यक्ष दिपक ओहोळ,पत्रकार विशाल घोलप,कमलेश घोलप,अक्षय परदेशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सुनिल वाशिंबेकर,निलेश जोशी,चैतन्य पाटील,अमर कारंडे,प्रा.दिग्विजय लावंड,विजय गांधी,शिवनाथ घोलप,अशोक सांगळे,संजय जमदाडे,गणेश वशिंबेकर,प्रवीण वीर,विशाल परदेशी,जितेश कांबळे सर,स्वप्निल भांडवलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE