करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात “लाडका ठेकेदार योजना” सुरु ? ; मातीवरच टाकले पेव्हर ब्लॉक – ग्रामस्थांची तक्रार

– करमाळा समाचार – 

दिवेगव्हाण ता. करमाळा येथे प्रतीपंढरपूर म्हणून एक भव्य दिव्य असे मंदिर उभारण्यात आले. त्यासमोर दोन टप्प्यात पेवर ब्लॉक टाकण्याचे काम करण्यात आले. पण त्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सदरच्या कामात नियमांचे पालन केले नसून निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याची तक्रार करीत संबंधिताची बिले काढू नयेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. मंदीरासह मशीदी समोर काम सुरु असुन तेही खराबच असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे रोज वेगवेगळ्या ठिकाणच्या ठेकेदाराच्या विरोधात तक्रारी येत आहेत. यापुर्वी वडगाव रायगाव रस्ता समोर आला होता.

http://*नकारात्मक बातमी* *करमाळा तालुक्यात बाप – लेकीच्या नात्याला काळीमा ; नराधम बापावर गुन्हा दाखल* https://karmalasamachar.com/karmala-a-case-has-been-registered-against-the-father/

politics

दिवेगव्हाण ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य असे विठ्ठल मंदिर उभारलेले आहे. या मंदिर परिसरात रोजगार हमी योजनेतून दोन टप्प्यात वीस लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सदर काम करीत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष पूर्ण केलेले दिसून आलेले नाहीत. मुळातच एखाद्या नव्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकताना सदर जमिनीवरील काळी माती बाजूला काढणे, त्यावर मुरूम टाकणे, पाणी मारून घट्ट करुन रोलर फिरवणे व काँक्रिटीकरण करून त्यावर कचखडी व त्यानंतर पेवर ब्लॉक टाकणे असा नियम आहे.

http://*बोकड व मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील दोघांना अटक* https://karmalasamachar.com/two-of-the-gang-who-stole-bucks-and-motorbikes-were-arrested/

पण सदरच्या कामांमध्ये कसलेही निकष पाळले गेले नाहीत. या ठिकाणी केवळ कचकडी व पेवर ब्लॉक टाकून घाई गडबडीत काम उरकले गेले आहे. मुळातच २० लाख खर्च करून होणारे काम केवळ पाच ते सात लाख रुपयात करण्याची व त्याचे बिले काढण्याची तयारी संबंधितांनी केली असल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांकडून केली जात आहे. याशिवाय मशीद पुढेही पेव्हर ब्लॉक टाकण्यासाठी दहा लाख रुपयांचं काम आले सुरु आहे असे रोजगार हमीतील ३० लाख रुपयांचे काम निकृष्ट दर्जाचे केलं जात असल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

तक्रारदार व अधिकारी म्हणतात ..

गावात मंदिरासह मशीदीपुढे तीन टप्प्यांमध्ये तीस लाख रुपयांचे काम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत मंदिरापुढील काम पूर्ण झाले आहे. परंतु वारंवार तोंडीतक्रार करूनही त्याचा दर्जा सुधारलेला नाही. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून करमाळा येथे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. जोपर्यंत काम योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत बिले काढू नये अशी आमची मागणी आहे.
– माऊली खाटमोडे, ग्रामस्थ दिवेगव्हाण.

सदरच्या कामाबाबत ग्रामस्थांकडून माहिती मिळाली आहे. याशिवाय संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत चांगले काम होत नाही तोपर्यंत सदर कामाचे बिल काढले जाणार नाहीत.
– मनोज राऊत, गटविकास अधिकारी करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE