करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील दोन मैदानावर होणार लेदर बॉल क्रिकेट सामने ; संपुर्ण स्पर्धेचे सामने जाहीर

प्रतिनिधी | करमाळा


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत दि. २ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीमध्ये भरविण्यात येणारी राजे जन्मंजय भोसले आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धाचे सामने दोन वेगवेगळ्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. तर सर्व सामन्यांचे आयोजन प्रथमच ग्रामीण भागात होणार असुन पहिला मान करमाळ्याच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला मिळाला आहे. यावेळी सामने कशा पद्धतीने होणार याची माहीती देण्यात आली.

या स्पर्धात २८ महाविद्यालयांचे संघ सहभागी होत आहेत. यामध्ये ४४८ खेळाडू मुले आपली चमक दाखवणार आहेत. पहिल्यांदाच ग्रामीण मध्ये होणारे सामने व त्याचे आकर्षण क्रिडा प्रेमीसाठी पर्वणी असणार आहे. यशवंतराव चव्हाण व जीन मैदान या दोन ठिकाणी मैदाने ठरवण्यात आली आहेत. यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला जेऊर, माढा व मोहिते पाटील महविद्यालय करमाळा यांचेही सहकार्य लाभत आहे. तर मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व शिवक्रांती स्पोर्ट क्लब यांच्यावतीने सीमा रेषेच्या दोरीचे सहकार्य झाले आहे.

अशा पद्धतीने असतील सामने …
सुरुवातीला टी २० सामने खेळले जातील तर नंतर एक दिवसीय सामने याच मैदानांवरती पार पडणार आहेत. टी ट्वेंटी सामन्यात सुरुवातीला( दि २) एसबीपी मुद्रूप विरुद्ध एसकेएन सिंहगड पंढरपूर, अकलुज विरूध्द वाय सी एम करमाळा,( दि ३) केबीपी पंढरपूर विरूध्द एन बी नवले सिंहगड सोलापूर, ॲसेंट कॉलेज सोलापूर विरूध्द एसएसएसोशल कॉलेज सोलापूर, (दि ४) बीपी सुलाखे बार्शी विरुध्द डी एच बी सोनी कॉलेज सोलापूर, श्री संत दामाजी मंगलवेढा विरुद्ध छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर असे सामने यशवंतराव चव्हाण कॉलेज मैदान होतील.

ads

तर जीन मैदान येथे (दि २) सांगोला महाविद्यालय विरूध्द पीएमपी करमाळा, लोकमंगल महाविद्यालय वडाळा विरूध्द डब्ल्यू आय टी कॉलेज सोलापूर. (दि ३) डीएसजी मोहोळ विरूध्द ग्रीन फिंगर कॉलेज अकलुज , माऊली महाविद्यालय वडाळा विरुद्ध डीएवी वेलनकर सोलापूर,( दि ४) एचएनसीसी सोलापूर विरुद्ध एस एम महाविद्यालय अकलुज व डी बी एफ दयानंद सोलापूर विरुद्ध बीएमआय टी बेलाटी सोलापूर आदि मधुन विजेत्याचे सामने पहायला मिळतील.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE