मुख्य रस्ता सोडुन भलतीकडे वळवली वाट ; मागणी नसलेल्या रस्त्याचा अट्टाहास कशाला ?
करमाळा प्रतिनिधी
अनेक वर्षांपासूनच्या मागणी नंतर मंजूर झालेला फिसरे ते गौंडरे हा ८ कोटी ८७ लाख रू खर्चून होत आहे. पण दहा किलोमीटर रस्ता चुकीच्या सर्व्हे मुळे हिवरे, कोळगाव, निमगाव या गावांना वगळून हिसरे मधून थेट गौंडरेला जोडण्याचे काम सुरू असल्याने पंधरा हजार नागरींकाची गैरसोय होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या 2022 च्या निकषला डावलून सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडणार असल्याचा युवासेनेच्या तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी इशारा दिला आहे. यामध्ये मागणी असलेल्या रस्त्यास प्राधान्य द्यावे, शाळा ,गावे मंदिर जोडली जावेत, बॅंक, बाजार दळवळणाची सोय व्हावी या निकषाकडे लक्ष वेधले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्यमंत्री सडक योजनेतुन फिसरे ते गौंडरे हे दहा कलोमीटरचे काम मंजूर आहे. सदर काम हे चुकीचा सर्वे झाल्याने हिवरे, कोळगाव हे दोन गावे वगळून हिसरे मधून गौंडरे ला नेले जात आहे. या संदर्भात खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्रावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित निकषाप्रमाणे अधिक्षक अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सोलापूर यांना प्रस्ताव सादर करण्याची सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
तसेच ६ जानेवारच्या निकषा प्रमाणे प्राधान्य क्रमांका नुसार निवड करून सबब उपरोक्त विषयास अनुसरून लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या निवेदन पत्रा नुसार पुढील कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी ग्राम सडक योजना सोलापूर विभागास दिले आहेत. याची दखल न घेता चुकीच्या पद्धतीने सदर रस्ता निर्माण करण्याचे काम सुरू आहे ते त्वरीत थांबवून हिवरे, कोळगाव, निमगाव या भागातील पंधरा हजार नागरिकांची कायम स्वरूपी समस्या सोडवावी सध्या सुरू असलेले काम थांबवावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
