आधी काम पुर्ण करु मगच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊ – आ. संजयमामा शिंदे ; एकाच वेळी सहा सदस्य शिंदे गटात
करमाळा समाचार
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या फीसरे गावातील नूतन सहा सदस्यांनी आ. संजय मामा शिंदे यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण आ.संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत असल्याचे सांगितले.

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी फीसरे या गावाला मामांनी मिळवून द्यावे. या एकाच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही संजय मामा शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत आहोत असे याप्रसंगी उपस्थित असलेल्या संदीप नेटके, प्रशांत नेटके, विजय अवताडे ,गणेश ढावरे, हनुमंत रोकडे ,प्रदीप ढेरे या सदस्यांनी सांगितले.
ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाला आपण बांधील असून ज्या वेळेस फीसरे गावांमध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचेल त्याच वेळेस गाव भेटीचा कार्यक्रम व प्रत्यक्ष प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम आपण घेऊ असे आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी बाबुराव नेटके ,पांडुरंग आवताडे, नारायण अवताडे,महादेव अवताडे ,गणेश कणसे ,मोहन नेटके, धनंजय शिंदे, रोहित नेटके, सूनील नेटके, नागेश चव्हाण ,विनोद नेटके , बाळनाथ नेटके ,दत्ता रोकडे ,अण्णासाहेब चव्हाण, लव्हे गावचे सरपंच विलास पाटील, डॉ. राहुल कोळेकर आदी उपस्थित होते.
