संकरित मका लागवड करून मका उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा
करमाळा प्रतिनिधी
रासी सिड्स कंपनीची 3499 ही संकरित मका एकरी 40 ते 45 क्विंटल उत्पादन देऊन कणसे काढल्यानंतर चारा हिरवागार राहत असल्यामुळे जनावरांचा खाण्याचा प्रश्न मिटत आहे. यामुळे या संकरित मका लागवड करून मका उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा असे आव्हान करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील यांनी केले.

आज गुळसडी येथे रासी कंपनीचा 3499 मका पिकाचा पिक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती गहिनीनाथ नन्नवरे, सरपंच समाधान यादव ,दूध डेअरीचे चेअरमन महावीर कळसे, पत्रकार अशोक नरसाळे , नासीर कबीर, संतोष जोशी , कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर खाडे, रासी कंपनीचे एरिया मॅनेजर अभिजीत गमे, टेरिटरी सेल्स मॅनेजर मिलिंद पाटील मिलिंद पाटील, रासी सीड्स कंपणीचे प्रोजेक्ट ऑफिसर नागेश चेंडगे, दिलीप कारंडे, राजवर्धन मिले, उपस्थित होते.

यावेळी रासी कंपनीचे अधिकृत विक्रेते महेश ॲग्रो एजन्सीचे संचालक महेश चिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना अतुल पाटील म्हणाले की आज मका बाजारात 2000 ते 2200 रुपये क्विंटल प्रमाणे विकत आहे एकरी 40 ते 45 क्विंटल उत्पादन होत असल्यामुळे एकरात चार महिन्यात 80 ते 90 हजारांचे उत्पन्न मिळते यामुळे मी सुद्धा 2 एकर मका करणार आहे.असा वाण उत्पादन व चारा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शिवाय हा चारा पीक काढणीनंतर हिरवागार राहत असल्यामुळे मुरघासासाठी याचा उपयोग होतो.
यावेळी रासी सिड्स कंपनीचे एरिया मॅनेजर गमे म्हणाले की, कंपनीने दहा वर्षाच्या प्रदिर्घ संशोधनानंतर हवामान शोधून काढला असून देशाच्या राष्ट्रीय बियाणे संशोधन महामंडळाने याला मान्यता दिली आहे. या मकेवर बारकोड चिटकवला आहे हा बारकोड च्या खाली मोबाईल नंबर दिला असून तुम्ही मका खरेदी केल्यानंतर एस एम एस केल्यानंतर तुम्हाला लकी ड्रॉ सिस्टीमचा लगेच मेसेज मध्ये तुम्हाला कोणतेही बक्षीस लागू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी हे वाण सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध झाले असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या वाणाची लागवड करून आपला फायदा करून घ्यावा असे आवाहन केले.