मकाई निवडणुकीत विरोधक ठाम ; पाच गटात लागु शकते निवडणुक – गोडगेंचा खळबळजनक दावा
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला असला तरी अद्यापही उर्वरित जागांवर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पाच गटातील सहा जागांवर विरोधक उभा ठाकणार असण्याची शक्यता असल्यामुळे उर्वरित मधून किती जण माघार घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे यांनी सहा जागांवर लढण्याची ठाम राहणार असल्याची जाहीर केले आहे.

विरोधी गटातील नेत्यांनी दावा केल्याप्रमाणे सुनीता गिरंजे या दोन गटातुन आहेत. त्यापैकी एका गटातुन माघार घेऊन दुसऱ्या एका उमेदवाराला संधी दिली जाऊ शकते. तर आप्पासाहेब जाधव व बाबुराव अंबोदरे हे भिलारवाडीतून, सुभाष शिंदे मांगी, गणेश चौधरी पारेवाडी तर अमित केकान वांगी येथुन इच्छुक आहेत पुर्वी पंचवीस अर्ज बाकी होते त्यातुन आज किती माघार घेतात यावर गणीत अवलंबुन आहे. एकुण सतरा जागांसाठी सदर निवडणुक होत आहे.

या ठिकाणी सर्वजण आपापल्या जागी ठाम राहिले तर निवडणूक लागली हे निश्चित आहे आतापर्यंत बारावी गटाच्या बाजूने जवळपास 11 जागांवर अविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी तालुक्यातील सर्व सभासदांच्या मतांवर भावी संचालक निवडणूक जिंकणार आहेत. त्यामुळे वांगी, पारेवाडी, वांगी व महिला गटात केवळ एक विरोधक उमेदवार जरी असला तरी त्या गटातून दोन उमेदवार निवडणून येणार आहेत. त्यामुळे आत्ताच कोणते उमेदवार निवडुन येणार हे सांगणे शक्य नसले तरी आकरा उमेदवार हे बागल गटाकडे असणार हे निश्चित झाले आहे. त्यातही अजुन माघार घेण्याची मुदत बाकी असल्याने त्याकडेही लक्ष राहिल.
आमचे सहाचे सहा उमेदवार निवडणुक जिंकतील व त्यानंतर बागल गटातील तीन उमेदवार आमच्यासोबत येणार आहेत. मग आम्ही सत्ता स्थापन करु असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गोडगे यांनी केला आहे.