करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह संपन्न; अनाठायी खर्चाला दिला फाटा

देवळाली (ता. करमाळा) येथे कानगुडे व चौरे-चापडगाव परिवाराचा आदर्श उपक्रम

करमाळा :
मौजे देवळाली (ता. करमाळा) येथे कानगुडे आणि चौरे-चापडगाव या दोन्ही परिवारांच्या वतीने साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवळाली येथील श्री विष्णू कानगुडे यांचे चिरंजीव दीपक आणि चापडगाव तालुका कर्जत येथील ज्ञानदेव चौरे यांची कन्या पुनम यांचे साखरपुड्यामध्येच लग्न लावण्यात आले. या कार्यक्रमासाठी दोन्ही परिवारातील नातेवाईक, मित्रपरिवार व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आले होते. दरम्यान, उपस्थित काही सामाजिक कार्यकर्ते व पाहुण्यांकडून साखरपुड्याबरोबरच विवाह करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास दोन्ही परिवारांनी आनंदाने व स्वखुशीने मान्यता दिली. यानंतर उपस्थित मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह विधी संपन्न करण्यात आला.

उपस्थित पाहुणे व मित्रपरिवार यांनी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देत या निर्णयाचे स्वागत केले. अनाठायी खर्चाला फाटा देत साध्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या पद्धतीने पार पडलेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला. समाजात अशा प्रकारचे साधेपणाचे आणि खर्चबचतीचे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE