लहानपणीच लग्न जमले पण वयात येण्याआधीच शरीरसंबधातुन मुलगी गरोदर ; मुलावर गुन्हा दाखल
करमाळा समाचार –
लग्नाचे अमिष दाखऊन अत्याचार केल्याप्रकरणी लोणेश्वरी भिलाटी पिंपळनेर ता. साक्री जि.धुळे येथील एकवीस वर्षीय युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. सदरची मुलगी अद्याप चौथीत शिकत असुन तीला दिवस गेल्याने सदर प्रकार उघडकीस आला. दोघेही उस तोडणी मजुर कुटुंबे वाशींबे गावात आल्या नंतर हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी राज विजय मालुसरे वय २१ यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, पिडीत मुलीच्या गावात राहणारे राज विजय मालुसरे वय अंदाजे 21 वर्षे हा नात्यातील दोघे लहान असतानाच दोघांचे लग्न ठरविले होते. परंतु दोघे वयात आल्यानंतर दोघांचे लग्न लावून देणार होते. ते जेव्हाही ऊसतोडणी साठी बाहेरगावी जायचे तेव्हा बऱ्याच वेळा राजचा परीवार हा पिडीत मुलीच्या परीवारासोबत असायचा. मागच्या वर्षी सन 2021 मध्ये “दसरा सण घरी पिंपळनेर येथे साजरा केल्यानंतर सुमारे 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबासह ऊसतोड कामासाठी वाशिंबे ता.करमाळा जि. सोलापुर या ठिकाणी गआले होते.

*सरकारी बाबुंना हाताशी धरुन जमीन घोटाळा ? ; बेकायदेशीर नोंद अखेर रद्द*
https://karmalasamachar.com/land-scam-involving-government-officials-the-illegal-entry-was-finally-cancelled/
तेथे पिडिता व राज मालुसरे असे दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. सुमारे तीन महीन्यापर्यंत एकमेकाशी प्रेमाच्या गप्पा मारत होते. त्यानंतर उसतोडणी करीत असताना सुमारे फेब्रुवारी ते एप्रिल 2022 या दरम्यान शेतात तिन वेळेस आज पावेतो आमचे शारिरीक संबंध झालेले आहेत. ते शारिरीक संबंध पिडीत मुलीच्या मर्जीने झालेले आहेत. त्यानंतर ऊसतोडणीचे काम संपल्यानंतर सुमारे 15 दिवसापुर्वी गावी पिंपळनेर येथे गेल्यावर मुलीची तब्बेत बिघडल्याने पिंपळनेर येथील एका खाजगी दवाखान्यात गेल्यानंतर तेथील डॉक्टर यांनी मी दिड महिन्याची गरोदर असल्याबाबत आम्हाला सांगितले. त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला.
ही माहीती गावातील अंगणवाडीत नोंदणी करण्यासाठी गेल्यावर प्रकरण पोलिसात पोहचले त्यानंतर कुटुंब व मुलीची संमती असतानाही मुलगी अल्पवयीन असल्याने मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.