मयुरेश लोंढे यांची गणित विषयातील पोस्ट डॉक्टरल फेलो अमेरिकेतील विद्यापीठात निवड
प्रतिनिधी –
केम ता.करमाळा येथील डॉ.मयुरेश महादेव लोंढे यांची गुणवत्तेच्या जोरावर गणित विषयातील पोस्ट डॉक्टरल फेलोसाठी अमेरिकेतील विद्यापीठात निवड झाली आहे. डॉ.मयुरेश लोंढे यांची गणित विषयात पीएचडी झाली असून पोस्ट डॉक्टरल फेलो इन मॅथेमॅटिक्स साठी अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी, ब्लूमिंगटन येथे त्यांची निवड झाली आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण केम येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण राजाभाऊ तळेकर विद्यालय येथे झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण आईआईटी चेन्नई व पीएचडी भारतीय विज्ञान संस्थान बेंगलोरला झाली आहे. रिकरन्स इन द डायनॅमिक्स ऑफ मेरोमॉर्फिक कॉरस्पॉन्डन्स् अॅण्ड होलोमॉर्फिक सेमीग्रुप्स यावर त्यांनी संशोधन केले आहे. हे संशोधन इंडियाना विद्यापीठात प्रसिद्ध झाले आहे. इंडियाना विद्यापीठातील पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. या निवडीबद्दल लोंढे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
