करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात महाविकास आघाडीची बैठक सुरू ; लोकांचा भरघोस प्रतिसाद

करमाळा समाचार

करमाळ्यात महाविकास आघाडीची बैठक सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवण्यात निमंत्रक असलेल्या सुनील सावंत यांना यश आले आहे. तर सदर बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ही हजेरी लावल्याने येणाऱ्या काळात सदरची वज्रमूठ ही निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची बैठक यशस्वी ठरत असून प्रस्थापित नेत्यांना आव्हान देणारी होण्याची दाट शक्यता आहे.

सदरच्या कार्यक्रमाला अभयसिंह जगताप यांचे निकटवर्तीय मान खटाव मतदारसंघातील माण मार्केट कमिटी संचालक दहिवडी विजय जगताप, राष्ट्रवादीचे माण तालुका अध्यक्ष युवा नेते ऋषिकेश जगताप, शिरगाव माण सरपंच किरण खळगे, एडवोकेट अमर जगताप, युवा नेते सुनिकेत जगताप, माढा तालुका अध्यक्ष काँग्रेस आय सौदागर जाधव, पंढरपूर तालुका अध्यक्ष काँग्रेस हनुमंत मोरे यासह करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे संजय शिंदे, राष्ट्रवादीचे गोवर्धन चौरे, हनुमंत मांढरे, शहराध्यक्ष प्रवीण कटारिया, देवा लोंढे, फारुक जमादार, ऍड सविता शिंदे, आजाद शेख, समीर हलवाई, बंटी राक्षे, अनिकेत केंगार, आदित्य जाधव, मयूर यादव, अरुण टोंगडे, हरिभाऊ मंगवडे, अर्जुन टके, विजय नवले, बबन चांदगुडे तसेच वेगवेगळ्या भागातून आलेले पदाधिकारी उपस्थित आहेत.

politics

करमाळा तालुक्याचा इतर तालुक्यातूनही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. तालुक्यातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या करमाळा येथील नालबंद मंगल कार्यालय येथे बैठक सुरु आहे. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या असे आवाहन करण्यात येत आहे. एकीकडे गटातटाचे नेते, विद्यमान आमदार, माजी आमदार, महायुतीच्या उमेदवार मागे उभे असताना एक आव्हान उभा करण्याचे काम सध्या सावंत व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group