करमाळासोलापूर जिल्हा

आमदार संजयमामा शिंदेंकडुन वचनपुर्ती ; नुतन सदस्यांचा शिंदे गटात प्रवेशाचा मार्ग मोकळा

करमाळा समाचार


करमाळा तालुक्याची वरदान असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र 24 गावत येते. परंतु कॅनॉलची व उपचारी यांची कामे अपूर्ण असल्यामुळे योजना कार्यान्वित होऊन 3 वर्षे झाली. तरीही लाभक्षेत्रांमधील हिसरे, अर्जूननगर आणि फीसरे या गावांना दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी अध्याप मिळालेच नव्हते. गतवर्षी जानेवारी महिन्यात अर्जुननगर व फीसरे या गावांना आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रथमच पाणी मिळाले होते.

यावर्षी फीसरे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आल्यानंतर आ. संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आम्ही तुमचे नेतृत्व मान्य करतो. आमच्या गावाला दहिगाव उपसाचे पाणी द्या अशी आग्रही मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत त्याची वचनपूर्ती आ. संजयमामा शिंदे यांनी केली असून दिनांक 24 फेब्रुवारी पासून फीसरे या गावाला पाणी सुरू असून तेथील ढवळे तलावात पाणी पोहोचले आहे. मुख्य कॅनल पासून फीसरे गावातील ढवळे तलावापर्यंत लोकवर्गणीमधून गावकरी मंडळींनी चारी खोदायचे काम पूर्ण केले . हा तलाव 100% भरण्याचे नियोजन आहे. आ. संजयमामा शिंदे यांच्या कामावरती तेथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

या पाण्याचे पूजन ग्रामपंचायतीचे सरपंच श्री प्रदीप दौंडे , उपसरपंच लता नेटके , ग्रामपंचायत सदस्य वैशाली ठावरे ,राधा अवताडे , हनुमंत रोकडे , प्रशांत नेटके , धनश्री काटे यांच्यासह भारत रोकडे , शरद नेटके , बाळू अवताडे, नारायण नेटके, महादेव आवताडे ,संदीप नेटके , सुमित आवताडे, नारायण नेटके, भारत रोकडे, शरद नेटके आदी ग्रामस्थांनी केले

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE