लसीच्या तुटवड्यामुळे पाचशी पेक्षा जास्त वृद्ध फिरले माघारी ; लस पुरवठा वाढवण्याची मागणी
दिलीप दंगाणे – जिंती
जिंती तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना लस पुरवठा अपुरा पडल्याने जवळपास 400 ते 500 वयोवृद्ध ग्रामस्थांना माघारी फिरावे लागले आहे. प्रशासनाकडून फक्त दोनशे लसींचा पुरवठा केल्याने व स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने सदरची पायपीट ग्रामस्थांना करावी लागल्याचे दिसून येत आहे.

करमाळा तालुक्यात सर्वात आधी जिंती येथे पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर संपूर्ण गाव बंद केले होते. त्याठिकाणी एका पाठी एक असे करत कोणा अनेकजण बाधित झाले होते. त्यानंतर आता जिंती गावात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले जात असून लसीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. काल सोशल माध्यमांच्या माध्यमातून लसीचा पुरवठा झाला असून उद्या डोस दिला जाणार असल्याबाबत माहिती देण्यात आली होती.

त्या माहितीच्या आधारे जिंती तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थांनी ज्यांचे वय पंचेचाळीसच्यावर आहे अशा वयोवृद्ध ग्रामस्थ रांगेत उभा होती. तर चारशे ते पाचशे ग्रामस्थ ओळीत उभा असताना लसीचा तुटवडा असल्याचे दिसून आले. फक्त दोनशे लस उपलब्ध झाल्याने प्रत्येकाने आपल्याला लस मिळावी यासाठी झुंबड घातली. या वेळी सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला. यावेळी केलेल्या उपाय योजना कुचकामी ठरल्याचे दिसून आल्या आहेत.
प्रत्येक गावासाठी लसीचे नियोजन करणे अपेक्षित असताना परिसरातील सर्वांनाच बोलल्याने एकाच वेळी झुंबड उडाली व अपुरी पडली कमीत कमी एका गावासाठी एकावेळी पाचशे तरी लस उपलब्ध असावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाऊ लागली आहे. आता पुढील केव्हा येणार याबाबत कसलीही माहिती कोणीही देत नसल्याने पुन्हा एकदा अनेकांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले आहे.