करमाळा समाचार ने आठवण करुन दिल्यावर खासदारांची औपचारिक भेट ; उद्या घेणार आढावा
करमाळा समाचार

माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कोरोना परिस्थिती चा आढवा घेण्यासाठीमंगळवारी मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जयकुमार शिंदे यांनी दिली आहे. मागील काही दिवसात करमाळा समाचार ने खासदार कुठे आहेत त्यांची जबाबदारी नाही का ? असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही बातमी खासदार साहेबांना पर्यंत पोहचवली व अखेर उद्या खासदार हे करमाळा दौऱ्यावर येत आहेत.

यावेळी ते जिल्ह्यातील कोविड सेंटर ला भेटी देणार असून प्रत्येक ठिकाणी आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेणार आहे. तसेच प्रशाशकीय आढावा घेणार आहेत.
सकाळी १२ ला माळशिरस येथून दौऱ्याला सुरवात होणार असून त्या नंतर माढा येथे दुपारी २ वा तर करमाळा येथे दुपारी ४ वाजता, पंढरपूर मध्ये ६ वाजता तर सांगोला येथे ८ वाजता येथे बैठक घेणार आहेत.
उद्या येऊन खासदार साहेब आहे ती परिस्थिती बदलण्यात काय सहकार्य करणार का ? फक्त औपचारिकता म्हणून आपला आढावा बैठक घेऊन निघून जाणार याकडे आता लक्ष लागले आहे.