करमाळासोलापूर जिल्हा

ते आले त्यांनी पाहिले आणी निघुन गेले ; ठोस भुमिकेशिवाय फोटो शुट वर दौरा संपन्न

करमाळा समाचार


करमाळा तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी कुठलीही भरीव मदत व ठोक आश्वासन किंवा मदत जाहीर न केल्यामुळे औपचारिक दौऱ्याची सांगता झाली आहे. खासदार आले व खासदार गेले अशीच भावना सर्वसामान्य आहेत.

आज करमाळा दौऱ्यावर आल्यानंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर आपल्या खासदार फंडातून काही मदत निधी जाहीर करतील व ऑक्सीजन व रेमडीसिवीर इंजेक्शन संदर्भात काही इंजेक्शन पुरवठा संदर्भात निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र केवळ तीस मिनिटांच्या दौऱ्यात त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा येथील सेंटरला भेट देऊन तात्काळ कुर्डूवाडी कडे रवाना झाले. त्यांच्यासोबत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा गोतावळा यांना खर्‍या अर्थाने प्रश्‍न समजून घेता आले नाही.

यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता ज्या पद्धतीने नगर चे खासदार सुजय विखे यांनी स्वतः प्रयत्न करून दिल्लीवरून त्यांच्या मतदारसंघात इंजेक्शनचे वाटप केले. त्या पद्धतीने आपले नियोजन काय आहे का ? यावर बोलताना ते म्हणाले की विखे यांचे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असून त्या माध्यमातून त्यांनी इंजेक्शन्स मागवले
तरीसुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून जास्तीत जास्त ऑक्सिजन व इंजेक्शनचा पुरवठा करमाळा तालुक्यात व करण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले.

खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी आपल्या खासदार फंडातून आज करमाळा तालुक्‍यासाठी कोरोनाचा लढाईसाठी रुग्णवाहिका, ऑक्सीजन सिलेंडर, इंजेक्शन्स यासाठी निधी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात काय ती अवतरली नाही.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE