श्री. आदिनाथ नंतर आता मकाई अडचणीत आणण्याचा डाव ? ; मुळातच अदिनाथ का आला डबघाईला व मकाईत काय आहे सुरु
करमाळा समाचार
श्री. आदिनाथ कारखाना काही कोटींच्या कर्जामुळे अडचणीत सापडला आहे. परंतु त्यापेक्षा दहा पटीने कर्ज असलेली कारखाने आजही मोठ्या डौलाने उभी राहिली आहेत. शिवाय त्या कारखान्यांना बँकाही कर्ज पुरवठा करायला तयार होतात. पण आदिनाथ सोबतच असे का झाले असावे हा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. तर आदिनाथ नंतर मकाई ची तीच अवस्था करण्याचा डाव तर विरोधकांचा नाही ना हा प्रश्न आता पडू लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यात आदिनाथ सहकारी साखर कारखाना कायमच चर्चा स्थानी राहिला आहे. या कारखान्याची भौगोलिक परिस्थिती पाहता इतर कारखान्यांनी पेक्षा या कारखान्याला सर्व सुविधायुक्त परिस्थिती असतानाही कारखाना डबघाईला जाण्याचे कारण अद्याप कोणालाच जमले नाही. कारखानदारी मध्ये संचालक मंडळ असेल किंवा सतत होणारी सत्ता बदल यामुळे कारखाना डबघाईला जाईल अशी परिस्थिती निर्माण होणे अशक्य आहे. पण आवर्जून कोणी याला रसातळाला पाठवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात काहीच अवघड नाही हे जाणकार जाणून आहेत.

सुरुवातीला आदिनाथ वरही अशाच पद्धतीने छोटी-मोठी आंदोलने झाली. कामगारांची देणी थकली गेली. त्यांची पगारी करण्याइतपत ही कर्ज प्रकरणे होईनात कारखाने कडे मालमत्ता मोठ्याप्रमाणावर असतानाही शिवाय लाखोंची साखर कारखान्याकडे गोडाउन मध्ये पडून असताना या कारखान्याला कोणीच का कर्ज देण्यास पुढे येत नव्हते. का याला मुद्दाम विरोध केला जाऊ लागला होता असा प्रश्न सध्या पडू लागला आहे. पण आता वेळ निघून गेली आहे. कारखाना बंद आहे. कामगारांची पगारी बंद आहेत. तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न आ वासून उभा आहे. कारखाना सुरू असला असता तर कमीत कमी थोड्या थोड्या फरकाने का होईना पगार व उसाचा प्रश्न मिटला असता. पण अशा छोट्या-मोठ्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी व सभासदांनी दुर्लक्ष केल्यामुळेच आज कारखाना बंद पाडण्याची वेळ आदिनाथ वर आली.
आता अजिनाथ नंतर तालुक्यातील दुसरा मोठा कारखाना मकाई सहकारी साखर कारखान्याचा नंबर लागतो का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मागील देणी देण्यासाठी संचालक मंडळ तसेच अध्यक्ष यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवून प्रकरण करण्याचा प्रयत्न केला व मागील देणी बँकेच्या खात्यावर जमा केली. कसे का असेना त्यांचा कारखाना सुरळीत चालवण्याचा प्रयत्न होता. आज कारखाना बंद पडला तर फक्त अध्यक्ष व संचालक मंडळ व कामगारांचे नुकसान नाही तर यात शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे हे जाणूनच हे धाडसी निर्णय घेतले असावेत असा अंदाज आहे.
परंतु काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःचा गट वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारखाना बंद पाडण्याचा डाव पुन्हा एकदा आखु लागल्या आहेत. एक कारखाना तर बंद पडला दुसरा पाडण्याच्या भूमिकेत सध्या काही जण दिसत असल्याच्या आरोप सध्या सोशल मीडियातून जोर धरत आहे. बागल गट कार्यकर्ते तसेच बऱ्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून असे बोलले जात आहे. यामध्ये विरोधी गटातील शेतकरी व कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. त्यांनीही मारहाणीचा प्रयत्न करण्याचा निषेध केला. परंतु कारखाना बंद पाडण्याची व्यूहरचना सुरू असेल तर ते चुकीचे असल्याचेही बोलले आहे.