महावितरण कर्मचाऱ्यांनी केला राज्यशासनाचा निषेध ; कार्यालयासमोर निर्दर्शने
प्रतिनिधी –
राज्य शासनाने महावितरण कंपनीची १६ शहरे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात करमाळ्यात महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते व अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने राज्यव्यापी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत सदरच्या सरकारच्या धोरणांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त करण्यात आला. चर्चेनंतर २६ संघटनेचे केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या सहीची आंदोलनाबाबत नोटीस ऊर्जामंत्री व तीनही कंपनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आज बुधवारी दि १६ रोजी महावितरण कार्यालयासमोर कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी अभियंता सुमित जाधव, रघुनाथ शिंदे, पुरुषोत्तम ढेरे, सुनिल पवार, विनोद कानडे, सुनिल ओतारी, प्रशांत घाटे, शशिकांत देहटे, सुधीर हांडे, सुनिल झुंजकर, दादा साठे, सतिष मिश्राम, भिमसेन गायकवाड, संतोष घरबुडवे यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Mseb, karmalanews, karmalasamachar, mahavikas aaghadi