करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आजच्या निकालावर तुल्यबळ संघर्ष अवलंबुन ; आज फैसला

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील समर्थक गटाने एन्ट्री केल्यापासून निवडणुक चुरस वाढलेली आहे. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले यांनी सहभाग घेतल्यामुळे काट्याची टक्कर होईल असे दिसत आहे. आता हरकतींच्या कोड्यातुन कोण मार्ग काढुन लढण्यासाठी समोर येतय त्यावर बरेचसे राजकारण अवलंबून आहे. राजेभोसले यांच्या पॅनलचे सदस्य मैदानात राहिले तर नक्कीच काट्याची टक्कर होणार हे नक्की आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्यावर स्थापनेपासून बागल गटाची सत्ता आहे. 17 जागेच्या या निवडणुकीत पूर्वीच एक जागा जवळपास अविरोध झाल्यात जमा आहे. त्यातच विरोधकांना सुरुवातीला ऊस उत्पादक गटातील उस नेमका कोणी घातलाय याचीच माहिती मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे नेमकं हरकतींच्या फेऱ्यात अडकू नये म्हणून कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न होता.

सवितादेवी राजे भोसले यांनी गोपनीय पद्धतीने बैठकींचा सपाटा लावला व छुप्या पद्धतीने कार्यकर्ते एकत्र केले व ऐनवेळी शेवटच्या दिवशी अर्ज भरायला आल्यानंतरच सर्वांना या गोष्टीचा उलगडा झाला. तेव्हापासून या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असली तरी बऱ्याचशा लोकांवर आदिनाथची शेअर्स रक्कम अपुरी व मकाईत तीन वर्षे उस न घातल्याचा आक्षेप घेत हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यावर आज निर्णय होऊन नेमके किती उमेदवार या रणसंग्रामात निभाव लागू शकतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.

आजचा निकाल हा मोहिते पाटील समर्थक गटाकडून लागल्यास नक्कीच सदरच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मोहिते पाटील यांच्या पाठीमागे कायमच तालुक्यातील अदृश्य शक्ती काम करताना दिसते. त्यांचे कार्यकर्ते हे तालुक्यात सर्वत्र तळागाळात पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घातल्यास नक्कीच तुल्यबळ अशी लढत पाहायला मिळू शकते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE