चिखलठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलगी गंभीर जखमी ; पळालेला बिबट्या दुसऱ्या शिकारीच्या शोधात
करमाळा समाचार
आज 7/12 2020 रोजी चिखलठाण केडगाव शेटफळ सीमेवरती राजेंद्र बारकुंड यांच्या शेतामध्ये सकाळी साडे अकरा दरम्यान ऊस तोडी टोळी मधील आठ वर्षाची मुलगी बिबट्याने पकडली होती. बिबट्याच्या तावडीतुन सुटका केली. परंतु मुलीची तब्येत चिंताजनक आहे.

करमाळा तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. आता पर्यत बिबट्याने प्रत्येक दुसऱ्या दिवशी हल्ला केला आहे. लिंबेवाडी अंजनडोह नंतर आता चिखलठाण परिसरात बिबट्याचा वावर हा स्पष्ट दिसून येत आहे. याठिकाणी आठ ते नऊ वर्षाच्या उस टोळीतील लहान मुलीला बिबट्याने उचलून नेले. प्रयत्न केला या झटापटीत तिला त्यांनी ओढत उसाच्या शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर जखमी केले. या वेळी झालेल्या झटापटीत गंभीर स्वरूपाची जखमी झाले असून तिझी परिस्थिती चिंताजनक आहे.

लोकांनी पळून लावल्यामुळे अजूनही बिबट्याला अपेक्षित भक्ष मिळाले नाही. तरी अजूनही चिखलठाण व परिसरामध्ये दुसऱ्यांदा बिबट्याचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. सध्या त्या लहान मुलीची परिस्थिती चिंताजनक असल्याने तिचे ही वाचण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.