महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट ; केम बंद कारवाईची मागणी
करमाळा समाचार
एका मुलाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर चुकीच्या पद्धतीने महापुरुषांबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी चिडलेल्या केमकरांनी गाव बंद करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये सर्व समाजाचे नागरीक व केमवासिय सहभागी झाले आहेत.

महापुरुषाचा व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड केल्यानंतर त्यावर आक्षेपार्ह कमेंट करून दोन धर्मात वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे केमकर यांनी संपूर्ण गाव बंद ठेवून संबंधीत मुलावर कारवाई ची मागणी करत आहेत. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. परंतु तो अद्याप मिळुन आला नाही सदरचा मुलगा अल्पवयीन असल्याचे समजत आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून कोणीही कायदा हातात घेऊ नका कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल.