ताज्या घडामोडी

छत्रपती जयंती निमित्ताने छत्रपतींचा मावळा करमाळ्याच्या वसंत जाधवचे होत आहे कौतुक

करमाळा समाचार

छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येकाच्या शरीरातील रक्त सळसळते व अंगावर काटा उभारल्या शिवाय राहत नाही व आपसूकच तोंडातून जय असे बाहेर पडते. पण शिवजयंती शिवाय इतर वेळी आपण साधं पुतळ्याकडे लक्ष तरी देतो का ? हा प्रश्न आपला आपण विचारला पाहिजे. केवळ राजकारण व लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी छत्रपतींचे नाव घेतले जाते. पण शहराच्या पुर्वेला उभा असलेले पुतळा मात्र दुर्लक्षितच राहतो. पण मागील पाच वर्षांपासून नित्यनियमाने पुतळ्याची सेवा करणाऱ्या वसंत जाधव याचं कौतुक होत आहे.

करमाळा शहराच्या पूर्व बाजूला देवीचा माळ रस्त्यालगत जुना बाह्यवळण रस्ता जातो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा आहे. या रस्त्यावरून वर्दळ असते. तर मोठ्या प्रमाणावर गाड्यांची येजा असल्याने परिसरात धूळ ही पुतळ्यावर जाऊन पडते. तर परिसर स्वच्छ जरी असला तरी धुळीमुळे पुतळ्यावर माती जाऊन बसते. त्यामुळे स्थानिक युवक पूर्वीपासून या ठिकाणची देखभाल व स्वच्छता करताना दिसून येत आहेत. त्यामध्ये वसंत जाधव हा वैयक्तिक कोणाच्याही सूचने शिवाय पुतळ्याची देखभाल करताना दिसून येत आहे.

जी गोष्ट कोणत्याही युवकाच्या लक्षात आली नाही ती गोष्ट वसंत जाधव यांच्या लक्षात आली की केवळ छत्रपतींचे नाव घेऊन जय म्हणण्यात अर्थ नाही तर त्यांच्या पुतळ्याचे ही जतन व स्वच्छता केली पाहिजे. त्यामुळे त्यांनी समोर येऊन निस्वार्थ भावनेने गेली पाच वर्षापासून पुतळ्याची सेवा करत आहेत. तर यासाठी त्यांनी आजपर्यंत कोणासमोर कसलाही प्रसिद्धीचा अट्टाहास केला नाही किंवा एकही फोटो त्यांनी परिसरात काढून प्रसिद्धी माध्यमांना दिला नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी रोज पुतळा स्वच्छ धुणे, हार व नित्य नियमाने सेवा करणे हे दैनंदिन कार्य वसंत जाधव चे होऊन बसले आहे. आजही त्याच्या परस्पर ही बातमी प्रसिद्ध होताना आम्हाला आनंद होत आहे. वसंत कडून काहीतरी शिकण्यासारखा आहे. त्याच्याकडून युवकांनी आदर्श घेतला पाहिजे. धन्यवाद वसंत ..!!

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE