प्रथम वर्धापन दिना निम्मित विविध कार्यक्रमचे आयोजित
करमाळा –
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुपीठ (त्रंबकेश्वर ) दिंडोरी प्रणित गुरुकुल पिठाचे पिठाधीश : प पु गुरुमाऊली व युवा संत चंद्रकांत (दादासाहेब ) मोरे यांच्या कृपा आशीर्वाद व आज्ञा ने दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्राच्या प्रथम वर्धापन दिना निम्मित विविध कार्यक्रमचे आयोजित केले होते. त्यात दिंडोरी प्रणित मार्गाचे 18 विभागाचे कार्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळी भूपाळी व महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक व सामुदायिक स्वामी सरामृत पठण करण्यात आले. मार्गाच्या मराठी अस्मिता विभागा आंतर्गत वर्षभराचे सन वार कसे करावे याची मांडणी करून पूर्ण माहिती देण्यात आली. त्यात दादासाहेबांच्या आद्येने पालखी सोहळा आयोजन करण्यात आला होता. खूप उत्साहित वातावरणात कार्यक्रम पार पडला. काल केंद्रात त्रिकाळी आरती करण्यात आली. व तसेच 18 फेब्रुवारी रोजी आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब यांच्या उपस्थिती वधू वर सूचक मेळावा अथर्व मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे याची माहिती व प्रचार करण्यात आला.