करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्रशासन निवडणुकीत व्यस्त असल्याने वाळु चोराचे फावले ; बिटरगावात वाळु चोर सक्रिय

करमाळा समाचार

प्रशासन सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना बिटरगाव श्री येथील सीना नदीच्या पात्रातून वाळू चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने सदरची वाळू चोरी केली जात आहे. तरी या वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मुरूमकर यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचे वाळू चोरीचे प्रमाण वाढलेले असताना भाऊसाहेब मुरूमकर व इतर सहकाऱ्यांनी याबाबत तहसील कार्यालय या ठिकाणी तक्रारी केल्यावर संबंधितावर कारवाई करण्यात आली. तेव्हापासून बऱ्यापैकी वाळू चोळी थांबवण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतु आता प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून वाळू चोरांनी पुन्हा एकदा सक्रिय होत वाळू चोरी करण्यास सुरुवात केली आहे.

वाळू चोरी करत असलेल्या लोकांना विरोध केल्यास ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे ग्रामस्थ ही उघडपणे बोलण्यास टाळत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांवर वेळीच निर्बंध घालणे गरजेचे आहे. यासंदर्भात आपण वेळोवेळी संबंधित यंत्रणेकडे तोंडी तक्रारी केलेले आहेत. पण त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडल्याचा दिसून येत नाही. गाव पातळीवर असलेल्या यंत्रणेने वेळीच यावर आवर घालणे गरजेचे आहे असे भाऊसाहेब मुरूमकर म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE