पै. अमित जगदाळे कंदर वेताळ साहेब केसरी चा मानकरी
करमाळा समाचार
पोफळज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे दि ५ रोजी सायंकाळी ग्राम दैवत वेताळ साहेब यात्रे निमित्ताने भव्य जंगी कुस्ती मैदान संपन्न झाले. पै. उमेश इंगळे यांचा पट्टा पै. अमित जगदाळे कंदर वेताळ साहेब केसरी चा मानकरी ठरला आहे.

शेवटची कुस्ती पै कलिम मुलाणी विरुध्द पै. अमित जगदाळे यांच्यात झाली पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास निमगिरे यांनी काम पाहिले. या कुस्तीत पै. अमित जगदाळे कंदर विजयी झाला. कुस्ती मैदानाला करमाळा व माढा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पै. नारायण आबा पाटील, करमाळा तालुका पंचायत समितीचे सभापती सभापती व डबल उप महाराष्ट्र केसरी पै. अतुल भाऊ पाटील, माजी उपसभापती पै. दत्तात्रय सरडे, महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास निमगिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव बदे, राजाभाऊ कदम, उत्रेशवर कांबळे, पै. आबा साहेब मारकड, पोफळज ग्राम पंचायत सरपंच दत्तात्रय आबा गव्हाणे, पोफळज ग्राम पंचायत आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायटी चे चेअरमन व कुस्ती प्रेमी उपस्थित होते.

पंच म्हणून मिंड वस्ताद जेऊर, आण्णा ढेरे साहेब, वस्ताद बापूसाहेब गव्हाणे पोफळज, पै. बाळासाहेब महाडीक भिवरवाडी, पांडुरंग मोरे चिखलठाण, गुरव वस्ताद , दाखले वस्ताद कंदर, सोमनाथ हजारे हजारवाडी, ज्योतिराम नरुटे दहिगाव, विजय भोसले पांडे, लक्ष्मण शिंदे ढवळस, आण्णा नायकुडे वस्ताद विहाळ, माॅनटी बोंदरे वस्ताद कुगाव, संजय निमगिरे वस्ताद जेऊर, बापूसाहेब गव्हाणे, पांडुरंग मोरे, मारुती धुमाळ, अचयुत गव्हाणे, अभिजीत पवार, अनिल हजारे, श्रावण काळेल, अमोल धुमाळ यांनी पंच म्हणून काम पाहिले.
यात्रा कमिटी
बलभिम गव्हाण, संभाजी शिंदे, मारुती पवार, संतोष पवार, नाना गोळे, शिवाजी पवार, आण्णा साहेब ढेरे, मुलाणी, गोरख हजारे, बंडू सुरवसे, शिवाजी क्षीरसागर, महादेव शिंदे यांनी यात्रा कमिटीचे काम पाहिले.
समालोचन निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा व कांडेकर सर जेऊर यांनी केले. कुस्ती मैदानाचे उत्कृष्ट समालोचन केल्याबद्दल निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा यांचा सन्मान पोफळज ग्राम पंचायत सरपंच दत्तात्रय आबा गव्हाणे व वेताळ साहेब यात्रा कमिटी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.