करमाळा तालुक्यातील कुगाव येथे पैठणच्या विवाहीतेची आत्महत्या ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
तुला स्वयंपाक निट करून वेळेवर करता येत नाही, तु घरातील कामे चांगले करीत नसुन मुलांकडे लक्ष देत नाही असे म्हणुन शारीरीक व मानसिक त्रास देऊन मुलीस आत्महत्या करणेस प्रवृत्त केल्यामुळे जावर्इ अशोक बबन मलकाकुल रा.बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद याच्या विरोधात मयत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

मुलगी मोहिनी अशोक मलकाकुल असे मयत मुलीचे नाव असुन तीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे. याप्रकरणी मुलीची आई प्रियाबाई उमाकांत आरनुरे वय 45 वर्षे धंदा मजुरी रा.चवंडानगर,अहमदपुर ता.अहमदपुर जि.लातूर यांनी तक्रार दिली आहे. त्या आपल्यागावी कुंभारकाम करून त्यावर येणारे उत्पन्नावर आमचे कुटुंबाची उपजिवीका भागवितात.

अशोक बबन मलकाकुल यांचेसोबत दि.25/01/2015 रोजी झाले होते.त्यानंतर त्यांना दोन मुले तेजस,शैलेश व मुलगी श्रुती अशी मुले झाली आहेत.लग्न झालेनंतर दोन वर्षापासुन मोहीनीचे पती अशोक मलकाकुल हे घरगुती कारणावरून तिचेसोबत भांडण करून नेहमी शारिरीक व मानसिक त्रास देत होते.
जावर्इ अशोक हे आमचे घरी येउन मी ऊस वाहतुकदार यांचेसोबत ऊस तोडणीकरीता करार करून उचल घेतलेली आहे.त्याकरीता मोहीनी हीस ऊसतोडणीकरीता सोबत घेउन जायचे आहे असे सांगुन मोहीनी व नात श्रुती यांना जावर्इ अशोक हा त्यांचे घरी घेउन गेला व त्यानंतर दोन- चार दिवसांनी जावर्इ अशोक,मुलगी मोहीनी व नात श्रुती करमाळा तालुक्यातील कुगाव येथे ऊसतोडणीचे टोळीसोबत ऑक्टोंबर 2020 मध्ये आला होता.
त्यानंतर मानसिक शाररीक त्रास तर होताच शिवाय घरातील राशन सुद्धा भरत नव्हता त्यामुळी मुलीच्या आईने किराणा पाठवला तरीही जावई मुलीस त्रास देतच होता. अखेर मुलीने कंटाळुन विहिरीत उडी घेऊन आत्मह्त्या केली.