पंचायत समीती सभापती गहिनीनाथ ननवरे यांचा राजीनामा ; राजकीय घडामोडींना वेग
करमाळा समाचार
पंचायत समिती सभापती गहीनाथ ननवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे. तर पुढील प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी निर्णय घेतील. त्या पद्धतीने पुढील कार्यवाही होणार आहे. सध्या कार्यकाल संपली संपायला सहा महिन्याची मुदत बाकी असून कोऱोना काळामुळे सभापतींचा राजीनामा मंजूर होईल की ? आहे त्याच सभापती उर्वरित कार्यकाल पूर्ण करावा लागेल हे अजून स्पष्ट झाले नाही.
करमाळा पंचायत समितीमध्ये माजी आमदार यांच्या गटाची सत्ता असून मागील अडीच वर्षात राखीव जागा असल्याने त्या ठिकाणी सभापती शेखर गाडे यांनी काम पाहिले. त्यानंतर उर्वरित अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी गहीनीनाथ ननवरे यांची वर्णी लागली होती. त्यावेळी अंतर्गत बाबी मधून अखेरचे अडीच वर्ष हे विभागून देण्याचे ठरवले. याबाबतच्या चर्चा आहे. त्याप्रमाणे सध्या गहीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
सुरुवातीला उपसभापती तर नंतर सभापती असे मिळून तब्बल साडेचार वर्षे आपण पंचायत समितीचे मुख्य पदे उपभोगली आहेत. त्यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांनी आपल्याला भरभरून दिले आहे. माजी आमदार पाटील हे जो निर्णय घेतील तो मान्य असून आपण ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला आहे. आपल्या कार्यकालात जे काम करायला मिळाले त्यामुळे आपण समाधानी आहोत.
– गहिनीनाथ ननवरे, सभापती, पंचायत समीती