पांडे गृप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अनिता मोटे विराजमान
प्रतिनिधी सुनील भोसले
पांडे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदी अनिता मोटे तर उपसरपंच पदी शिवाजी भोसले विजयी पाटील गटाची एक हाती सत्ता, पांडे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये खांबेवाडी धायखिंडी या दोन वाड्या येत असून यामध्ये तेरा सदस्यांची संख्या आहे त्यातून सात महिला आणि सहा पुरुष निवडुन आले आहेत यामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षित जागा पडल्याने सरपंच पदासाठी चढाओढ सुरू होती यामध्ये नारायण आबा पाटील गटाकडून सरपंच पदाचा दावा सुरूवातीपासून होत होता.

तर दिनांक 11/2/2021 रोजी सरपंच निवडीच्या वेळी नारायण आबा पाटील गटाकडून अनिता बाळासाहेब मोठे यांनी सरपंच पदासाठी तर शिवाजी अभिमान भोसले यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांनी तेरा पैकी आठ मतानी विजय मिळवला तसेच संजय मामा शिंदे जगताप गटाकडून सरपंच , उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता यामध्ये विरोधाकाचा आठ मतांनी पराभव झाला.

या निवडणुकीत नारायण आबा पाटील गटाच्या अनिता बाळासाहेब मोटे यांना आठ मते पडली तर शिवाजी अभिमान भोसले यांनाही आठ मते पडली सरपंच व उपसरपंच दोन्ही पाटील गटाचे विजयी झाले यावेळी धायखिंडी ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आतापर्यंत पांडे गावाने आम्हाला कधीच सरपंच पदांचा बहुमान दिला नव्हता परंतु आज वेगळं चित्र पाहायला मिळाले आणी मोठ्या मनाने आम्हाला सरपंच पदाचा मान दिला म्हणुन आम्ही सर्व नूतन सदस्यांनच आभार मानतो.
तसेच पांडे गावातील मागासवर्गीय समाजाला आतापर्यंत कुरघोडीच्या राजकारणामुळे कधीच उपसरपंच पदाचा मान दिला नव्हता आता धायखिंडीमुळे उपसरपंच पदाचा बहुमान मिळाला म्हणून धायखिंडीतील सर्व सदस्यांनच गावाच्या वतीने आम्ही आभारी आहोत या निवडीचे कौतुक संपूर्ण गावातून केले जात आहे.