करमाळासोलापूर जिल्हा

पोथरे -निलज ग्रामपंचायत मध्ये बागल पाटील गटाच्या सरपंच पदी धनंजय झिंजाडे तर उपसरपंच अंकुश शिंदे..

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले


पोथरे- निलज ग्रामपंचायतीवर गेली पंधरा वर्षापासून बागल गटाची एकहाती सत्ता होती. यावेळेस निवडणुकीत प्रथमच बागल-पाटील गटाची युती झाली आणि बागल गटाचे पाच व पाटील गटाचे चार तर शिंदे-जगताप गटाचे चार अशा तेरा उमेदवारांनी आपले नशीब अजमवले आहे. यामध्ये नवीन चेहर्यांना नूतन सदस्य म्हणून संधी मिळाली.

पोथरे ग्रामपंचायत आरक्षण सोडत मध्ये सरपंच-उपसरपंच सर्वसाधारण पडल्यामुळे सर्व विजयी उमेदवारांना सरपंच होण्याचे स्वप्न पडले होते. परंतु बागल-पाटील गटाने विजयी उमेदवार एकत्रित बैठक घेऊन चिठ्ठी द्वारे सरपंच निवडण्याची घोषणा केली. यामध्ये बागल गटाचे धनंजय झिंजाडे व पाटील गटाचे इंजि.अंकुश शिंदे यांच्या नावे चिठ्ठी टाकण्यात आली. यामध्ये बागल गटाचे सरपंच पदासाठी धनंजय झिंजाडे तर पाटील गटाचे उपसरपंच पदी अंकुश शिंदे हे विजयी घोषित केले. परंतु शिंदे-जगताप गटाने सरपंच पदासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी चांगलेच लावून धरले होते. आणि सरपंच पदासाठी विठ्ठल भाऊ शिंदे व उपसरपंच साठी संजय जाधव यांनी अर्ज भरला. आणि गुप्त मतदान करण्याची सुध्दा मागणी केली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक दरवडे,पोथरे पोलिस पाटील समाधान पाटील,चित्राताई राऊत शिपाई सुनील जाघव,हमीद शेख,हुशेन पठाण यांनी कामकाज पाहिले. तर पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडूळे यांच्या आदेशानुसार अशोक पाटील,आकाश भोजणे यांनी बंदोबस्ताचे कामकाज शांततेत पार पाडले. सरपंच निवड विरोधकांनी चांगलेच लावून धरल्याने चर्चेचा व अस्तित्वाचा विषय ठरला होता.त्यातच विरोधकांनी विजयी सदस्यांचे गुप्त मतदान करण्याची मागणी निवडणूक अधिकारी मारकड यांच्याकडे केली. त्यानुसार निवड प्रक्रिया राबवण्यात आली.सरपंच-उपसरपंच निवडणूकीत बागल-पाटील गटाचे झिंजाडे – शिंदे सरपंच-उपसरपंच यांना 9 मते तर शिंदे-जगताप गटाचे शिंदे – जाघव यांना 4 मते पडली. मतदान प्रक्रिया उपस्थितीत सदस्यांनी गुप्त पद्धतीत शांततेत पार पडली. प्रथमच बागल-पाटील युतीची पोथरे ग्रामपंचायतीवर सत्ता आली‌ आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE