शिक्षकांचा कोविड काळात सहभाग ; पण शिक्षकांना अजुन लस का नाही ?
करमाळा समाचार
कोविड 19 जनजागृती तसेच विविध कामांसाठी शिक्षकांचा आवर्जुन वापर करण्यात आला. पण जेव्हा लस देण्याची वेळ आली तेव्हा शिक्षकांशिवाय इतर जे कार्यरत होते त्या समुहाना 100 टक्के लस टोचवली पण शिक्षकांना आवर्जुन 100 टक्के लस का नाही दिली गेली ? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

covid-19 बाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी आढावा बैठकीमध्ये दिनांक 9 रोजी व प्रांत व तहसीलदार यांनी दिनांक 18 रोजी सुचना दिल्या त्यामध्ये माझे गाव कोरोना मुक्त गाव करण्यासाठी गावपातळीवर ग्रामस्तर पथकाची नेमणूक केली आहे. संबंधित पथकात ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची कमिटी स्थापन केली आहे. गावस्तरावर या कमिटीने भाजीवाले , दूधवाले , किराणा दुकानदार यांना शंभर टक्के मास्क घालण्यास प्रवृत्त करणे. तसेच प्रत्येकाची कोविड टेस्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे.

covid-19 बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचना यांचे पालन करणे. ग्रामस्तर कमिटीच्या अध्यक्षांनी सर्व कर्मचारी यांना विभाग वाटून देणे व त्या विभागांमध्ये कोरोणाच्या बाबतीमध्ये जनजागृती करणे. लोकांमध्ये covid-19 बाबत जनजागृती करण्यासाठी गावांमध्ये स्पीकर चा , दवंडी पालकांना बोलावून सांगणे, मुलांकडून प्रसार करणे या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. ग्रामस्तर कमिटीतील अध्यक्षांनी बाजार , मंदिर, मशिद या ठिकाणी मास्क न घातलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून संबंधिताची कोवीड टेस्ट करणे.
प्रत्येक दुकानात किंवा प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी नो मास्क नो एन्ट्री अशाप्रकारचा बोर्ड लावण्यास भाग पाडणे. गावातील 100 टक्के दुकानातील कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करणे, लोकांचा अनावश्यक प्रवास टाळणे किंवा बाहेर येऊ न देणे. बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी ऑक्सीजन, टेम्परेचर मोजणारी यंत्रणा तयार ठेवणे व प्रत्येक व्यक्तीचे मोजमाप करणे. सर्वच मोठ्या दुकानात खरेदी-विक्री करताना पैशाची देवाण-घेवाण न करता ऑनलाइन व्यवहार करणे वरील प्रत्येक बाब ही ग्राम स्तर कमिटीने होऊ न देण्याच्या बाबतीत प्रयत्न करावे प्रत्येक शाळेतील 100% शिक्षकांचा सहभाग आवश्यक आहे.
त्यामुळे वरील बाबी सकारात्मक करण्यासाठी ग्रामस्तर समितीने शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच ,तालुका पंचायत सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य यांना सर्वांना विश्वासात घेऊन जनजागृतीचे काम करावे. तसेच कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या वीस लोकांची यादी व कोरोना बाधित व्यक्तीचे नाव त्वरित गटशिक्षणाधिकारी कार्यालयास व आरोग्य विभागास त्याच दिवशी कळवावे असे आदेश जिल्हा परिषदने काढलेले आहेत.
शिक्षक हा लहान मुलांपासुन मोठ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार घटक असल्याने ऐनवेळी शाळा कॉलेज तसेच शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण असेल किंवा तांदुळ वाटप ही कामे करावीच लागतात मग अशात शिक्षक बाधीत असल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार शिवाय त्या संबंधित शिक्षकास कोरोनाने काय झाल्यास त्याला जबाबदार कोण, शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेय का ? नेमकी त्यांनी काळजी काय घ्यायची हे त्यांना शिक्षण देण्यात आलेय का ? उद्या अचानक शाळा सुरु झाल्यास पुढे काय असे अनेक प्रश्न उद्भवली आहेत.