वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन काळाची गरज; सर्वांनी पुढे येवून यासाठी पुढाकार घ्यावा – हिम्मतराव जाधव
सोलापूर (सचिन जव्हेरी )
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे….प्रमाणे आज आपण वक्ष संवर्धन व वृक्षारोपण सारखे कार्यक्रम राबविणे काळाची गरज असून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घ्यावा व सृष्टीचा समतोल राखावा अन्यथा पुढील काळात अनेक समस्यांना सर्वांच सामोरे जावे लागेल असे आवाहन जिल्हा पोलीस उपअधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक हिम्मतराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, सोलापूर येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारोह हिम्मत जाधव, अपर पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण तथा जिल्हा समादेशक होमगार्ड, सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते होमगार्ड जवानांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

तदनंतर सकाळी ठीक 10.30 वाजता जिल्हा समादेशक होमगार्ड, सोलापूर कार्यालयाच्या परिसरात 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थित महिला व पुरुष होमगार्ड यांच्याशी संवाद साधला. तसेच मान्यवरांनी होमगार्ड कार्यालयाची पाहणी केली.
नुकतेच सन – 2022 चे होमगार्ड दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल या कार्यालयाचे श्री. एकनाथ जगन्नाथ सुतार, पलटण नायक तथा प्रभारी केंद्र नायक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर, डॉ.राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, विजय कबाडे, पोलीस उपायुक्त,सोलापूर शहर, श्री. हिम्मत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तथा जिल्हा समादेशक, होमगार्ड, सोलापूर आदी मान्यवर व जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील अमित माळी, प्रशासिक अधिकारी,विक्रांत मोरे, वरिष्ठ लिपिक, सुनील चव्हाण कनिष्ठ लिपीक, राहुल इंगळे, प्रभारी अधिकारी, सोलापूर शहर पथक हे उपस्थित होते.