नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तीन प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
करमाळा समाचार
मा.जिल्हा दंडाधिकारी सो सोलापूर यांनी पारित केलेल्या आदेशाची कोणत्याही सबळ कारणाशिवाय उल्लंघन करून स्वत:च्या व समाजातील इतर लोकांच्या जिविताला गंभीर धोका निर्माण केला असल्याने तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शहरातील तीन प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांवर करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा हा इशारा असुन यातुन कोणाची गय केली जात नाही हे यातुन दिसुन येत आहे.

दिनांक 05/05/2021 रोजी सकाळी 10:45 वा.सुमारास करमाळा शहरातील गुगळे किराणा नावाचे दुकान असून सदरचे दुकान हे अत्याश्यक मध्ये येत असून त्यांनी सोशल डिस्टिंगचे पालन केले नाही. दुकानाचे मालक संतोष पोपटलाल गुगळे रा. करमाळा त्यांनी त्यांचे दुकानामध्ये 24 ते 25 लोक होते. तरी
दुसऱ्या घटनेत दिनांक 5 रोजी सकाळी 10:30 वा.सुमारास करमाळा शहरातील भंडारे रेडीमेट अन्ड होजीअली नावाचे कापड दुकान असून सदरचे दुकान हे अत्याश्यक सेवेमध्ये येत नसून दुकानाचे मालक सुरेश किसनराव भंडारे रा.करमाळा यांनी त्यांचे दुकान हे चालू ठेवून त्या दुकानामध्ये मालाची विक्री करित होते.

तसेच तिसऱ्या ठिकाणी दिनांक 05 रोजी सकाळी 09:30 वा.सुमारास करमाळा शहरातील गणेश सुपर मार्केट हे स्टेशनरी दुकान असून सदरचे दुकान हे अत्याश्यक सेवेमध्ये येत नसून दुकान मालक सतिश ओमप्रकाश अग्रवाल रा.करमाळा यांनी त्यांचे दुकान हे चालू ठेवून त्या दुकानामध्ये मालाची विक्री करित होते.