करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मकाई बीला संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा ; तीन तारखेला सयुक्त बैठक

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आज मोठी अपडेट समोर येत आहे. लवकरच जिल्हाधिकारी, आंदोलक, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच तहसीलदार, मकाई कारखान्याची, आजी माजी पदाधिकारी या सर्वांसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन दिनांक 3 रोजी करण्यात आले आहे अशी माहिती आंदोलन करते एडवोकेट राहुल सावंत दिली.

मागील काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्ते व करमाळा तहसीलदार यांची एक बैठक करमाळा येथे पार पडली होती. यावेळी आंदोलनकर्ते त्यांच्या वतीने शेतकरी कामगार संघर्ष समीती ज्येष्ठ नेते दशरथ कांबळे, एडवोकेट राहुल सावंत, प्रा. रामदास झोळ, रवींद्र गोडगे यांनी मकाई कारखान्याच्या थकित बिलासाठी २६ जानेवारी रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय आज सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दखल घेत ३ जानेवारी रोजी बैठकीचे नियोजन केले आहे.

यावेळी आंदोलन प्रमुख नेत्यांसह जवळपास वेगवेगळ्या भागातील 50 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामन बदे, दशरथ कांबळे, ॲड राहुल सावंत, रविंद्र गोडगे, अजिनाथ भागडे, शहाजी माने, हरिभाऊ मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE