करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नादुरुस्त बसेस दुरुस्त करून देणार असल्याचे वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांचे आश्वासन -प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी वांरवार बंद पडणाऱ्या नादुरुस्त एसटी बस स्पेशल केस म्हणून दुरूस्त करून देणार असल्याचे आश्वासन सोलापूर जिल्हा वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनी यांनी दिले आहे. करमाळा तालुक्यातील वांरवार एसटी बस बंद पडत असल्यामुळे विद्यार्थी नागरिक महिला प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होत असल्याने याबाबत प्रा.रामदास झोळ सर यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन.प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नवीन चाळीस गाड्या देण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा विभागीय वाहतूक शाखेचे प्रमुख अजय पाटील यांच्याकडे ‌निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, करमाळा तालुका जिल्ह्याच्या म्हणजेच पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद यांच्या सीमेवर असणारा तालुका आहे पंढरपूर वारी करता लाखो भावीक या आगारातून प्रवास करीत असतात. करमाळा आगारातील सर्व बसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. रात्री अपरात्री निर्जन स्थळी बसेस बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हात हाल होत असून यामुळे कोणतीही जीवित असा वित्त हानी बस बंद पडल्यामुळे होऊ शकते. करमाळा तालुक्यातील प्रवासाच्या मानाने ज्या बसेस आहे. त्या बसेस जुन्या झाल्यामुळे त्यांचे पार्ट मिळत नसल्यामुळे त्या गाड्या नादुरुस्त होत आहेत.

यामुळे रुग्ण लहान मुले महिला यांचा प्रवास अत्यंत धोकादायक झालेला आहे शासनाने जाहीर केलेले योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रवासाची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे बसेस कमी पडत आहे. याची आपण गांभीर्याने दखल घेऊन नवीन बसेस उपलब्ध करून जुन्या बसेस दुरुस्त करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन बस मिळाव्यात नादुरुस्त बस दुरुस्त करून मिळाव्यात यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाही देण्यात आले असून त्यांनीही तीन जानेवारी रोजी ‌मीटिंग घेऊन आपल्या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करण्याची आश्वासन त्यांनी दिले आहे.

एस टी वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनीही स्पेशल केस म्हणून सोडतो नादुरुस्त बस दुरुस्त करून घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करून देण्याचे आश्वासन प्रा.रामदास झोळ सर यांनादिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ अण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, ॲड राहुल सावंत, हरिदास मोरे, अंजनगाव चे उपसरपंच शहाजी माने त्यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE