जामखेड तालुक्यात कावळा व कोकिळेचा तडफडुन मृत्यू बर्ड फ्ल्यु असल्याची शक्यता ; तपासणीसाठी पाठवले पुण्याला
जामखेड प्रतिनिधी
नुकतेच मुगगाव व परिसरात अनेक कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्या कावळ्यांचा ‘बर्डफ्ल्यू’ ने मृत्यूझाल्याचा रिपोर्ट आला आहे. त्यापार्श्वभुमीवर रेडेवाडीत घडलेला प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे या पक्षांचाही बळी बर्ड फ्लु ने झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट दिली आहे. अधिक माहीती घेतली जात आहे.

जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड – बीड रोडवरील रेडेवाडी फाट्याजवळ रोड पासून शंभर फूट अंतरावर कावळा आणि कोकीळ पक्षी तडफडून मेल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना नुकतेच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले नितीन डोंगरे यांनी दिली सदर घटना ही सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांना दूरध्वनीद्वारे कळवली.

यावेळी ताबडतोब वनमजूर शामराव डोंगरे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे पाठवले कोठारी आणि डोंगरे हे स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथिल प्रत्यक्षदर्शी दासा रोडे यांचे असे म्हणणे आहे की, कावळा, कोकीळा यांना तडफडत असताना पाहिले आहे. त्यापैकी एक कावळा अंदाजे कुत्र्यांनी खाल्याचा आंदाज आहे. त्या ठिकाणी कावळा व दोन-तीन लहान पक्षी अजून मरून पडले आहेत अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सदर घटना भयानक आहे.? त्या मुळे संजय कोठारी यांनी वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांना फोनवरून घटनेची माहीती सांगितले आहे की, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गवारे यांच्याशी ताबडतोप संपर्क साधून त्या कावळ्याचे स्वँब घेऊन त्याचे पोस्टमार्टम करा आणि पुढील तपास ताबडतोब करा अन्यथा जामखेडला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी हे घटनास्थळी जाऊन त्या कावळ्याची पाहणी केलेली आहे. पँक करून पुण्याला प्रयोग शाळेत पाठवला आहे.
पशुवैदयकीय आधिकारी व त्यांची टीम त्या मृत कावळा ताब्यात घेऊन पुढील तपासनी साठी पुणे येथे पाठवनार असल्याचे पशुवैदयकीय आधिकारी डाॅ. गावारे यांनी सागीतले आहे. त्यांनी वनपरीक्षेत्र आधिकारी छबीलवाड साहेब यांनी मृत कावळा पक्षी मोहा यथे बीड रोड लगत असल्याचं पत्र डाॅ, गवारे यांना दिले आहे डाॅ. गवारे व त्यांची टीम ने घटनास्थळी वन कर्मचारी वनमजुर ताहेरअली सय्यद , शामराव डोगरे, यांनी पहानी करून मृत कावळा पक्षी पशुवैदयकीय आधिकारी डाॅ, गवारे यांचे कडे पुढील तपासनी साठी त्याचे ताब्यात दिले तो कावळा पक्षी पुणे येथे पाठवला असे पशुवैद्यकीय आधिकारी डाॅ गावारे यांनी सागीतले.