पोलिस पाटील भरती प्रक्रियेत आजच्या मुलाखतीला स्थगीती
करमाळा समाचार
पोलीस पाटील भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये आज मुलाखत घेण्याचा दिनांक असताना सदरची मुलाखत प्रक्रिया स्थगित करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने आज तोंडी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आजच्या होणाऱ्या तोंडी परीक्षेला स्थगिती देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
