मांजरगाव येथे ओल्या चाऱ्या पासून मुरघास निर्मिती प्रशिक्षण संपन्न
करमाळा समाचार -संजय साखरे
महाराष्ट्र शासन – कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा यांचे वतीने मौजे मांजरगाव ता. करमाळा येथे दि. २८ व २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ओल्या चाऱ्यापासून मूरघास निर्मिती या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित पशुपालक शेतकरी तसेच शेतमजूर यांना कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील पशुसंवर्धन विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव यांनी पशुपालन व पोषणासाठी मुरघासाचे महत्व व फायदे, मुरघास तयार करण्यासाठी सुयोग्य हिरवी पिके, मुरघास तयार करण्यासाठी मुलभूत सोयीसुविधा – (बांधकाम, मशिनरी, अवजारे ) तसेच गुणवत्तापूर्ण मुरघास तयार करण्यासाठी विविध पुरक पदार्थांचे मिश्रण करणे, मुरघास पॅकिंग व साठवणूक करणे इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर मुरघास तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

तसेच मौजे – कोर्टी ता. करमाळा येथील प्रगतीशील पशुपालक शेतकरी तथा मुरघास तज्ञ श्री. श्रीमंत झाकणे यांनी मूरघास तयार करताना घ्यावयाची काळजी, जनावरांचे वयोमानानुसार द्यावयाचे मूरघासाचे प्रमाण, मूरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके व विविध पद्धती इत्यादी विषयावर सखोल माहिती देऊन श्री. संतोष आप्पा पाटील यांचे गोठ्या वर प्रत्यक्ष मुरघास निर्मिती चे र्प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी तालुका कृषी अधिकारी करमाळा श्री. संजय वाकडे, मंडळ कृषि अधिकारी केत्तूर श्री. देविदास चौधरी, बारामती येथील मुरघास तज्ञ डॉ. सतिष जाधव, पशुसेवा संघटना करमाळा तालुका अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण जगताप, सहयाद्री ॲग्रो दूध संकलन अधिकारी श्री. हेमंत बन, एबीएस इंडिया पुणे कंपनीचे सेल्स मॅनेजर श्री. निलेश लगड, कृषि पर्यवेक्षक श्री. काशीनाथ राऊत, मांजरगावचे सरपंच श्री. महेशकुमार कुलकर्णी, मकाई सह. साखर कारखान्याचे संचालक श्री. संतोष पाटील, कृषि सहाय्यक श्री. उमाकांत जाधव, नितीन ठोंबरे, फारूक बागवान, सोमनाथ गायकवाड तसेच मांजरगाव, उंदरगाव, रिटेवाडी, वाशिंबे, राजूरी, उमरड व परीसरातील पशुपालक शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
सदरील कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अजयकुमार बागल व सत्यम झिंजाडे यांनी केले. प्रथिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेनंतर प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.